धक्कादायक! स्वस्तात सोने देण्याच्या बहाण्याने भरदिवसा 11 लाखांना लुटले: जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल.

धक्कादायक! स्वस्तात सोने देण्याच्या बहाण्याने भरदिवसा 11 लाखांना लुटले: जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल.

जामखेड प्रतिनिधी,

स्वस्तात सोने घेण्याच्या आमिषाने आलेल्या तरुणास आठ ते दहा जणांच्या टोळक्याने मारहाण करून अकरा लाख रुपयांना लुटले आहे. ही घटना जामखेड तालुक्यातील कुसडगाव रस्त्यावर घडली आहे. या प्रकरणी आठ ते दहा जणांवर जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरदिवसा ही घटना घडल्याने जामखेड तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

सविस्तर असे की, फीर्यादी राजेंद्र मैड यांना आमच्याकडे स्वस्तात सोने आहे ते आम्ही तुम्हाला स्वस्तात देतो असे सांगून काल बुधवार दि १४ मे रोजी दुपारी ३:०० वाजण्याच्या सुमारास जामखेड तालुक्यातील कुसडगाव रस्त्यावरील पुलाच्या जवळ बोलवले. फीर्यादी हे त्यांचे काही सहकारी घेऊन सदर ठिकाणी पोहचले. ते सोबत स्वस्तात मिळत असलेले सोने घेण्यासाठी दहा लाख रुपये घेऊन आले होते.

त्याठिकाणी आल्यानंतर घटनास्थळी असलेल्या आठ ते दहा जणांनी फीर्यादी यांना मारहाण करून त्यांच्या जवळील पिशवीत आसलेले रोख दहा लाख रुपये तसेच गळ्यातील सोन्याची चैन, हातातील चांदीचे कडे मनगटी घड्याळ व मोबाईल असा एकुण ११ लाख ५ हजार रुपयांचा ऐवज लंपास करुन सर्वजण घटना स्थळावरून पळुन गेले.

त्यानंतर फिर्यादी यांनी तातडीने जामखेड पोलीस स्टेशनला धाव घेतली. त्यानुसार यातील फिर्यादी राजेंद्र दिलीप मैड (वय ३५), रा. आश्वी खुर्द ता. संगमनेर यांनी जामखेड पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी अश्विनी (पुर्ण नाव माहीत नाही), अतुल (पुर्ण नाव माहीत नाही) व सोबतचे ८ ते ९ अनोळखी इसम आशा एकुण आठ ते दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे व पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी भेट दिली. तसेच घटनास्थळी श्वान पथकास पाचारण करण्यात आले होते. सध्या पोलीस आरोपींचा कसून शोध घेत आहेत. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर हे करीत आहेत.

चौकट

काल दि. १५ रोजी झालेला प्रकार गंभीर आहे.याचा जामखेड पोलीस कसून तपास करीत आहेत. मात्र याप्रकारे स्वस्तात सोने खरेदी करण्याच्या प्रकारास बळी पडून कोणीही आपली फसवणूक करून घेऊ नये.महेश पाटील पोलीस निरीक्षक, जामखेड पोलीस स्टेशन जामखेड

Loading

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles