Home जामखेड वार्ता जामखेडमध्ये परत रात्रीच धक्कादायक स्नॅचिंग! १.५ लाखांची सोन्याची चैन हिसकावून चोरटे फरार

जामखेडमध्ये परत रात्रीच धक्कादायक स्नॅचिंग! १.५ लाखांची सोन्याची चैन हिसकावून चोरटे फरार

0
5

जामखेडमध्ये रात्रीच धक्कादायक स्नॅचिंग! १.५ लाखांची सोन्याची चैन हिसकावून चोरटे फरार

जामखेड पोलीस स्टेशनला दोन अज्ञात चोरट्या विरोध्दात गुन्हा दाखल

जामखेड प्रतिनिधी –

अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात रविवारी (१२ एप्रिल २०२६) रात्री घडलेल्या एका धक्कादायक घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. मिलींदनगर, जामखेड येथील रंजना राम काळे (वय ५५ वर्षे, घरकाम, रा. मिलींदनगर, या महिलेच्या गळ्यातील ५० ग्रॅम (प्रति ग्रॅ. ₹३०००, एकूण ₹१,५०,०००) किंमतीची सोन्याची चैन अज्ञात मोटारसायकलवरील दोन इसमांनी ओढून घेतली. नागेश शाळेसमोरून घरी जात असताना रात्री ९.१० वाजता ही घटना घडली असून, तक्रारीनुसार गुन्हा रात्री ११.४१ वाजता जामखेड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
पोलिस स्टेशन जामखेडला गु.र.क्र.: २०१/२०२६ कलम बीएनएस २०२३ कलम ३०४(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे दिनांक १२ एप्रिल रात्री ११.४१ वाजता आरोपी दोन अज्ञात इसम (अटक नाही) फरार झाले आहेत फिर्यादी रंजना काळे नागेश शाळेसमोरून मिलींदनगर येथील त्यांच्या घरी चालत जात होत्या. अचानक अज्ञात मोटारसायकलवर आलेल्या दोन इसमांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन जोरात ओढली आणि वेगाने फरार झाले. या घटनेमुळे रंजना यांना धक्का बसला असला तरी सौभाग्याने शारीरिक इजा झाली नाही. त्या घाबरून घरी पोहोचल्या आणि तात्काळ जामखेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.या घटनेमुळे मिलींदनगर आणि परिसरातील नागरिकांमध्ये भीती पसरली आहे.

विशेषतः महिलांना रात्री एकटे फिरू नये आणि मौल्यवान दागिने कमी करावेत असे आवाहन पोलिसांनी केले आहे. जामखेड शहरात अलीकडे चोरीच्या घटना वाढल्याने नागरिकांची अस्वस्थता वाढली आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही नेटवर्क वाढवण्याची आणि नाइट पेट्रोलिंग तीव्र करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.
या प्रकरणाचा तत्काळ तपास करून आरोपींना लवकर अटक करण्याची अपेक्षा आहे.

Loading

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page