19.6 C
New York
Sunday, June 21, 2026

जामखेड तालुक्यात चोरी, सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास

जामखेड तालुक्यात चोरी, सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास

जामखेड :-
तालुक्यातील बावी येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सुमारे ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.


याबाबत अभिजीत भास्कर निकम (वय २९, रा. बावी) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, ११ एप्रिल रोजी रात्री कुटुंबीय जेवण करून झोपले होते. पहाटे साडेचारच्या सुमारास घरातील सदस्यांना घरात चोरी झाल्याचे निदर्शनास आले.

चोरट्यांनी घरात प्रवेश करून लोखंडी कपाट तसेच किचनमधील धान्याच्या डब्यांची उचकापाचक केली. यामध्ये तांदळाच्या डब्यात ठेवलेले सुमारे २५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने (गंठण, बोरमाळ, झुबे) अंदाजे ६२,५०० रुपये किमतीचे तसेच १०,००० रुपये रोख रक्कम (५०० रुपयांच्या २० नोटा) चोरीस गेली.


एकूण सुमारे ७२,००० रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे. विशेष म्हणजे, गावातीलच आणखी एका घरातही याच रात्री चोरी झाल्याची माहिती समोर आली आहे.या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Loading

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

You cannot copy content of this page