23.9 C
New York
Sunday, July 19, 2026

तपनेश्वर रोड येथील साई समर्थ स्टील भांड्याच्या दुकानात पोलीसांचा छापा…

तपनेश्वर रोड येथील साई समर्थ स्टील भांड्याच्या दुकानात पोलीसांचा छापा…

 जामखेड प्रतिनिधी –

जामखेड शहरातील स्टील व भांड्याच्या दुकानात जामखेड पोलीसांनी छापा टाकला असता ३९ गोण्यामध्ये १६३५ किलोग्रॅम वजनाच्या तांब्याच्या लहाण मोठ्या, सोललेल्या तारा ज्या शेती पंपासाठी उपयोगात येतात अशा मिळुन आल्या. त्याबाबत यातील आरोपीकडे माल ताब्यात बाळगण्याबाबत विचारणा केली असता आरोपी याने कोणतेही कागदपत्रे सादर केले नाहीत तसेच सदर मालाबाबत उडवाउडवीची उत्तरे दिली तेव्हा सदर तांब्याच्या तारा या चोरीच्या असल्याचे निदर्शनास आल्याने पोलीसांनी महाराष्ट्रपोलीस अधिनियमकलम १२४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत जामखेड पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, जामखेड शहरातील तपनेश्वर रोड येथे महेश मोहनलाल भंडारी (वय ४८ वर्षे रा. तपनेश्वर रोड, जामखेड) यांचे साई समर्थ स्टील व भांड्याचे दुकान आहे.

जामखेड पोलीसांना माहीती मिळाली की, सदर दुकानात शेतीपयोगी उपयुक्त असलेली तांब्याच्या लहान मोठ्या तारा आहे. त्यानुसार पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित मोरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी गुरवार दिनांक १६ रोजी साडेआठ वाजता छापा टाकला असता साई समर्थ स्टील या भांडयाच्या दुकानात ९,७९,२००/- रुपये किं च्या लहाण मोठया ३९ गोण्यामध्ये एकुण १६३५ किलोग्रॅम तांब्याची सोललेली तार जी शेतीपंपासाठी उपयोगात येणारी त्यामध्ये लहाण मोठे तुकडे आढळून आले.

त्याबाबत यातील आरोपी महेश भंडारी याचेकडे माल ताब्यात बाळगण्याबाबत विचारणा केली असता आरोपी याने कोणतेही कागदपत्रे सादर केले नाहीत तसेच सदर मालाबाबत उडवाउडवीची उत्तरे दिली यावरून पोलिसांची खात्री झाली की, सदर तांब्याच्या तारा या चोरीच्या आहेत. पोलीस कॉन्स्टेबल कुलदिप घोळवे यांच्या फिर्यादीवरून १२४ गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक अजित मोरे करत आहेत.

Loading

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

You cannot copy content of this page