Home जामखेड वार्ता नगरपरिषदेच्या वतीने अग्निशमन आणि बचाव सेवेचा लोकार्पण संपन्न

नगरपरिषदेच्या वतीने अग्निशमन आणि बचाव सेवेचा लोकार्पण संपन्न

0
3

जामखेड शहराच्या प्रगतीबरोबर सुरक्षिततेसाठी
अग्निशमन आणि बचाव सेवा – नगराध्यक्ष प्रांजल चिंतामणी

नगरपरिषदेच्या वतीने अग्निशमन आणि बचाव सेवेचा लोकार्पण संपन्न

जामखेड प्रतिनिधी

जामखेड शहराच्या प्रगतीबरोबर सुरक्षिततेसाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आणि सुरक्षिततेसाठी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या माध्यमातून अग्निशमन आणि बचाव सेवा
(Fire and Rescue Services) सुरू करण्यात आली आहे. या सेवेमुळे आगीशी लढण्यासाठी, जीवितहानी टाळण्यासाठी आणि आपत्कालीन परिस्थितीत लोकांना वाचवण्यासाठी कार्य करणारी एक अत्यंत महत्त्वाची अग्निशमन यंत्रणा जामखेड
नगरपरिषदेत दाखल झाली आहे.

आज नगरपरिषदेच्या प्रांगणात अग्निशमन बचाव सेवा गाडीचे लोकार्पण संपन्न झाले यावेळी नगराध्यक्ष प्रांजल अमित चिंतामणी, मुख्याधिकारी अजय साळवे, गटनेते तात्याराम पोकळे, अमित चिंतामणी, सभापती श्रीराम डोके, मोहन पवार, अर्जुन म्हेत्रे, प्रविण चोरडिया, मनोज कुलकर्णी, प्रविण होळकर, प्रविण सानप, अशोक शेळके व नगरपरिषद कर्मचारी

यावेळी बोलताना प्रांजल चिंतामणी म्हणाल्या की,
आगीवर नियंत्रण मिळवणे आणि ती विझवणे, इमारती कोसळणे, रस्ते अपघात, पूर किंवा इतर आपत्कालीन परिस्थितीत अडकलेल्या लोकांची सुटका करणे यासाठी ही गाडी उपयोगी ठरणार आहे. महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांच्याकडे मिनी फायर अग्निशमन वाहानाची मागणी केली होती. त्यांनी संबधित विभागाला सांगुन जामखेड नगरपरिषदेस हे मिनी फायर अग्नीशमन रेस्क्यू वाहन उपलब्ध करून दिले. त्याबद्दल देखील नगराध्यक्षा प्रांजलताई चिंतामणी व नगरसेविकांसह सभापती प्रा.राम शिंदे यांचे आभार मानले.

यानंतर मुख्याधिकारी अजय साळवे म्हणाले की शहराचा वाढता विस्तार व अरुंद रस्ते यासाठी मिनी अग्नीशमन रेस्क्यू वाहानाची आवश्यकता होती. या वाहनाच्या माध्यमातून फोम व पाण्याच्या सहाय्याने आग विझवता येते. जामखेड नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागात ही व्हॉन दाखल झाली आहे.

विषेश म्हणजे अरुंद रस्त्याबरोबरच हे मिनी अग्निशमन वहान हे आपत्कालीन परिस्थितीत घरांची पडझड कींवा पुर परीस्थितीत देखील लोकांना वाचवण्यासाठी मदत करणार आहे.


यावेळी नगरसेवक ॲड. प्रविण सानप यांनी सांगितले की सभापती प्रा.राम शिंदे यांच्या सहकार्याने व नगराध्यक्षा, मुख्याधिकारी व नगरसेवक यांच्या प्रयत्नांनी हे मिनी अग्नीशमन रेस्क्यू वाहन जामखेड नगरपरिषदेस उपलब्ध झाले आहे. याचा शहरातील नागरिकांना नक्कीच फायदा होईल असे सांगून कार्यक्रमाचे आभार मानले.

Loading

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page