नीता नन्नवरे पुणे जिल्हा कारागृह पोलीस पदी  निवड ..

नीता नन्नवरे पुणे जिल्हा कारागृह पोलीस पदी  निवड ..

स्वामी विवेकानंद स्पर्धा परीक्षा केंद्र जामखेड यांच्यावतीने सन्मान..

जामखेड प्रतिनिधी,

नीता नन्नवरे यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा नन्नवरे वस्ती अरणगाव व माध्यमिक शिक्षण अरणेश्वर विद्यालय अरणगाव येथे झाले.महाविद्यालयीन शिक्षण जामखेड महाविद्यालय जामखेड येथे पूर्ण केले.

मागील दोन वर्षापासून स्वामी विवेकानंद स्पर्धा परीक्षा केंद्र जामखेड येथे स्पर्धा परीक्षा तयारी होत्या. नुकतीच त्यांची पुणे जिल्हा कारागृह पोलीस पदी निवड झाली.

पुणे जिल्हा कारागृह पोलीस पदी निवड झाल्याबद्दल स्वामी विवेकानंद अभ्यासिकेत नीता नन्नवरे यांचा सत्कार सेंच्युरी मॅथ्स क्लासेस संचालक श्री अमोल ढाळे सर यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना जीवनात यश मिळवताना येणाऱ्या अडचणीवर मात कशी करावी याविषयी अनमोल मार्गदर्शन केले.

स्वामी विवेकानंद स्पर्धा परीक्षा केंद्र जामखेड मध्ये मिळत असलेले शांत व प्रसन्न  वातावरणातील अभ्यासिका वर्तमानपत्रे, मासिके, नोट्स, स्पर्धा परीक्षा पुस्तके आणि मार्गदर्शन या सुविधा बद्दल सर्वांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी  स्पर्धा परीक्षा तयारी करणारे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक उपस्थितांचे स्वागत संचालिका प्रियंका शिंदे केले. सूत्रसंचालन संतोषी बहिर यांनी केले व उपस्थित सर्वांचे आभार श्री शिंदे बी.एस.सर यांनी मानले.

Loading

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles