सहारा हॉस्पिटल येथे प्रत्येक शनिवारी मोफत आरोग्य तपासणी शिबीर

*सहारा हॉस्पिटल येथे प्रत्येक शनिवारी मोफत आरोग्य तपासणी शिबीर*

जामखेड प्रतिनिधी,

 

जामखेड येथील सुसज्ज असलेल्या सहारा हॉस्पीटल च्या वतीने जुन महिन्यापासून प्रत्येक शनीवारी मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन संचालक डॉ. सुनिल हजारे व डॉ मनोज शिंदे यांनी केले आहे.

या शिबिराचा जामखेड शहरातील व ग्रामीण भागातील रुग्णांना व नागरिकांना होणार आहे सर्व सुख सुविधा युक्त असे हॉस्पिटल सर्व तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध आहेत.

सहारा हॉस्पीटल व आय.सि.यु. हॉस्पीटलच्या वतीने नेहमीच विविध उपक्रम राबवले जातात या उपक्रमा बरोबरच गरजु व गोरगरीब रुग्णासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा सुविधाउपलब्ध करून समाज सेवी मुल्य जपत रुग्ण सेवा केली जात आहे. याच पार्श्वभुमीवर संचालक डॉ. सुनील हजारे, डॉ मनोज शिंदे व त्यांच्या सर्व डॉक्टर टीमच्या माध्यमातुन लोक हिताचा निर्णय घेण्यात आला असून आता सहारा हॉस्पीटलच्या माध्यमातुन जुन 2025 या महिन्यापासून प्रत्येक शनिवारी मोफत तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरातुन प्रत्येक स्वरूपाच्या आजारी रुग्णांची मोफत तपासणी करून मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे संचालक डॉ. सुनील हजारे व डॉ मनोज शिंदे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून स्पष्ट केले आहे. प्रत्येकाने या शिबीराचा लाभ घेऊन तपासणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

या शिबिरामध्ये प्रामुख्याने ECG, फुफुसाची क्षमता मोजणे, शुगर तपासणी होमोग्लोबिन B. P व इतर अनेक तपासणी केल्या जातील.हॉस्पिटलची वैशिष्ट्य-अतिदक्षता विभाग, सर्पदंश, विषबाधा सर्जरी, ऑर्थो स्त्रीरोग व प्रसूती, श्वसनाचे विकार दमा, फुफुसाचे सर्व आजार यावर निदान व उपचार

या सुविधाचा रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन सहारा हॉस्पिटल च्या वतीने करण्यात आले आहे.

Loading

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles