शिवनेरी अकॅडमी येथे त्रिदल आजी माजी सैनिक संघ जामखेड च्या वतीने 76 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

शिवनेरी अकॅडमी येथे त्रिदल आजी माजी सैनिक संघ जामखेड च्या वतीने 76 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

युवा उद्योजक आदर्श फाउंडेशन जामखेड संचालक आकाश बाफना यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण संपन्न

जामखेड प्रतिनिधी –

कार्यक्रमाचे मुख्य अतिथी युवा उद्योजक आदर्श फाउंडेशन जामखेड संचालक आकाश बाफना यांच्या शुभहस्ते शिवनेरी अकॅडमी या ठिकाणी त्रिदल आजी-माजी बहाद्दूर सैनिक विशेष पंचक्रोशीतील मान्यवर व शिवनेरी अकॅडमीचे विद्यार्थी यांच्या उपस्थिती मध्ये ध्वजारोहण संपन्न झाला यावेळी सूत्रसंचालन सचिव शहाजी ढेपे यांनी”उत्सव तीन रंगाचा आभाळी आज सजला
नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडविला.ज्यांनी भारत देश घडविला”अशा देशभक्तीच्या पक्तीने सुरुवात केली. तर कार्यक्रमाची प्रस्तावना उपाध्यक्ष कांतीलाल कवादे आणि आभार अध्यक्ष कॅप्टन लक्ष्मण भोरे यांनी मानले.

यावेळी सल्लागार सुग्रीव आडळे यांचे चिरंजीव यांची BHMS पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सन्मान संघातर्फे करण्यात आला व अकॅडमी चे माजी विद्यार्थी पार्थ मोहोळकर,निलोफर पठाण देशभक्तीवर गीत झाले डॉ सानप,डॉ कैलास हजारे समाजसेवक नामदेव राळेभात कार्यक्रमाचे अध्यक्ष आकाश शेठ बाफना यांचे मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जामखेड येथील शिवनेरी अकॅडमी या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये साजरी होत आहे.

आज या ठिकाणी आल्यानंतर एक अभिमानास्पद वाटतं की, आपल्या या जामखेड पंचक्रोशीमध्ये इतकी मोठी अकॅडमी एक देश कार्यामध्ये एक समाज घडवण्यामध्ये आज अग्रेसर आहे. आज या ठिकाणी प्रजासत्ताक दिनानिमित्त बरेचसे आजी माजी सैनिक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे.तसेच या सर्वांचे मी या ठिकाणी खूप खूप धन्यवाद देतो व पुढील कार्यासाठी शिवनेरी अकॅडमीला शुभेच्छा देतो.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले.तसेच तहसील कार्यालय जामखेड,नवीन नगरपरिषद या विविध ठिकाणी जाऊन आजी-माजी सैनिकाच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाला.

यावेळी उपस्थित संघाचे अध्यक्ष कॅप्टन लक्ष्मण भोरे,उपाध्यक्ष कांतीलाल कवादे,सचिव शहाजी ढेपे,सल्लागार सुग्रीव अडाळे,मार्गदर्शक अरविंद जाधव,कोषाध्यक्ष राजकुमार भराटे, सदस्य पोपट, सांगळे पोपट कोरडे, नवनाथ आंधळे, वसंत माळवे, नितीन गरजे, तानाजी गर्जे, बळीराम ढाळे,शहादेव पवार,सुरेंद्र सानप,दादासाहेब कोल्हे,अशोक चव्हाण,सुखदेव साबळे,दत्तात्रय डिसले, हरिभाऊ कदम,गणेश कदम,सतीश ठाकरे,बाळू कोठाळे,ज्ञानदेव गोपाळघरे, रावसाहेब कापसे,गोरख आजबे, भारत राऊत, दामोदर राऊत, जगन्नाथ धर्माधिकारी आदी सैनिकांची उपस्थिती मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Loading

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles