शहीद जवानांना मानवंदना देण्यासाठी रक्तदान करावे – न्यायधिश रजनीकांत जगताप….

111 रक्तदात्यांनी केले रक्तदान.

जामखेड पोलीस स्टेशनच्या वतीने महा रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न.

जामखेड प्रतिनिधी –

मुंबई 26-11 दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेले पोलीस व शहीद देशाचे सैनिक व पोलीस हुतात्मा दिनाच्या स्मरणार्थ जामखेड पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली
मी रक्तदान करतो, तुम्हीही रक्तदान करा या टॅगलाईनखाली जामखेड पोलीस स्टेशनच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात रक्तदान करून मुंबई हल्ल्यातील शहीद जवान व हुतात्मा दिनाच्या स्मरणार्थ तरुणांमध्ये देशाप्रती, समाजाप्रती, भारत राष्ट्राप्रती प्रेमाची आणि त्यागाची भावना जागृत ठेवण्यासाठी आज दि. ४ डिसेंबर रोजी सकाळी १० ते ५ वाजताचे दरम्यान पोलीस स्टेशन येथे होत असलेल्या शिबीरात रक्तदान करावे


लोकांमध्ये रक्तदानाविषयी जनजागृती करण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वांनी रक्तदान करावे. असे आवाहन जामखेडचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी केले आहे. या शिबिराचे उद्घाटन जामखेड न्यायालयाचे न्यायाधीश रजनीकांत जगताप साहेब यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी प्रमुख उपस्थिती प्रांत अधिकारी सायली सोळंके मॅडम, तहसीलदार योगेश चंद्र, पोलीस निरीक्षक महेश पाटील, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ , प्रा मधुकर आबा राळेभात, सहायक पोलीस निरीक्षक संगीता गिरी, पोलीस उपनिरीक्षक अनिल भारती, स फौजदार शिवाजी भोस , बिबीशन धनवटे, रमेश आजबे, शमीर सय्यद ,एनसीसी ऑफिसर मयूर भोसले , भगवान मुरूमकर, रमेश आजबे, बापू गायकवाड, बिभीषण धनवडे, शमीर सय्यद, शरद कार्ले,अंकुश ढवळे, सोमनाथ पचारणे,हर्षल डोके हवालदार शिवाजी कदम, पोलीस नाईक अजय साठे, पोलीस कॉन्स्टेबल बेलेकर, दिनेश गंगे, सचिन पिरगल, संतोष कोपणर, उपस्थित होते.

आदी मान्यवर उपस्थित होते.जामखेड न्यायालयाचे न्यायाधीश रजनीकांत जगताप साहेब यांनी रक्तदान करून शिबिराचे उद्घाटन केले.यावेळी न्यायाधीश जगताप यांनी मनोगतामध्ये रक्तदान करणे ही अतिशय चांगली गोष्ट आहे रक्तदान सर्वश्रेष्ठ दान आहे. अपघात प्रसंगी रक्ताचा तुटवडा जाणवतो व सर्व देशांमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत आहे असे माध्यमातून ऐकत असतो. रक्तदान कार्यक्रमात आपण सर्वांनी सहभाग घेऊन रक्तात केले पाहिजे व आपल्या रक्ताचा उपयोग सर्वांना होईल व एखाद्या व्यक्तीचा जीव वाचेल.
आपण स्वतः रक्तदान करून इतरांना ही प्रेरित करावे आणि मी स्वतः रक्तदान करून संदेश देतो की आपणही रक्तदान करावे. असे मनोगत व्यक्त केले
पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी पोलीस बांधव शहीद झाले आहे त्यांची भारत मातेच्या प्रती त्यागाची भावना आहे त्याचे स्मरण होणे होण्यासाठी या शिबिराच्या आयोजन केले आहे. सामाजिक बांधिलकी जपत आपण सर्वांनी रक्तदान करावे
रक्तदान करून देशाप्रती शहीद झालेल्या जवानांना मानवंदना द्यावी असे मनोगत व्यक्त केले.
सूत्र संचलन मयुर भोसले यांनी केले.रक्तदान शिबिर यशस्वी होण्यासाठी पोलीस निरीक्षक महेश पाटील यांचे सह, पोलीस नाईक अविनाश ढेरे, पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश जाधव यांनी प्रयत्न केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *