जामखेड पोलीसांन कडुन 10 लाख 35 हजार रु कीमतीच्या 36 मोटारसायकली हस्तगत

जामखेड प्रतिनिधी

फायनान्स कंपनीत काम करत असल्याचे सांगून आमच्या कडील मोटारसायकली कंपनीने ओढून आणलेल्या आहेत त्यातुम्हाला स्वस्त किंमतीत देतो, असे सांगून नातेवाईक व ओळखीच्या लोकांना चोरीच्या विविध कंपनीच्या मोटारसायकली विकल्या होत्या. याच अनुषंगाने जामखेड पोलीसांनी या चोरीस गेलेल्या 10 लाख 35 हजार रुपये किंमतीच्या 36 मोटारसायकलीसह दोन सराईत चोरट्यांना पकडुन त्यांच्या कडुन हस्तगत केल्या आहेत.

या प्रकरणी 36 मोटारसायकल चोरणाऱ्या आरोपी वैभव बाबासाहेब खेडकर, वय 35 व सुधीर शहाजी सुरवसे, वय 32 दोघे रा. माहीजळगाव ता. कर्जत यादोघांना जामखेड पोलीसांनी अटक केली आहे. याबाबत नुकतेच कर्जत जामखेड चे उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे व जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी पत्रकारांना माहिती दिली.

यावेळी पत्रकारांशी बोलताना उपविभागीय अधिकारी वाखारे यांनी सांगितले की, दि. 16 आँगस्ट रोजी सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस कॉ. कुलदीप घोळवे, पो. कॉ. भगीरथ देशमाने हे बस स्थानक परिसरात पेट्रोलिंग करत असताना आरोपी वैभव बाबासाहेब खेडकर रा. माहिजळगाव, ता. कर्जत. जि. अहमदनगर हा संशयतरित्या बिगर नंबर प्लेट मोटारसायकलवर फिरत होता. यावेळी त्याच्याकडे मोटारसायकल बाबत कागदपत्रांची चौकशी केली असता त्याला समाधान कारक उत्तर देता आले नाही. यावेळी पोलीसांनी त्याला ताब्यात घेऊन जामखेड पोलीस स्टेशनला आणले व मोटारसायकल बाबत चौकशी केली असता त्याने सांगितले की मी व माझा मित्र सुजित शहाजी सुरवसे रा .माहीजळगाव सदर मोटारसायकल चोरीत सहभागी असल्याचे सांगितले.

आरोपी वैभव खेडकर याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने सांगितले की, आम्ही काहीही कामधंदा करत नाहीत, दारू व चैन करण्यासाठी पैशाची गरज भागविण्यासाठी आम्ही जामखेड, श्रीगोंदा, कर्जत, संभाजीनगर, पुणे, अहमदनगर, धाराशिव, लातूर व बीड या जिल्ह्यातून गर्दीच्या ठिकाणाहून मोटारसायकली चोरी केल्याचे सांगितले. चोरलेल्या मोटारसायकली आमच्या नातेवाईक व ओळखीच्या लोकांना सदर फायनान्स कंपनीचे नाव सांगून कंपनी कडून ओढून आणलेल्या आहेत असे खोटे सांगून या मोटारसायकली परिसरातील लोकांना विकल्या आहेत.

दोन्ही आरोपींकडून जामखेड पोलीसांनी दहा लाख पस्तीस हजार रुपये किंमतीच्या 36 मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत. याबाबत पोलिसांकडून सापडलेल्या मोटारसायकल मालकांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. यामुध्ये 36 मोटारसायकल पैकी हरवलेल्या 16 मोटारसायकल बाबत विविध पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत. आरोपींकडे आणखी चौकशी सुरू आहे. या चौकशी मध्ये आनखी काही चोरीच्या मोटारसायकली मिळुन येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

याबाबत जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी असे आवाहन केले आहे की, ज्यांची मोटारसायकल चोरीस गेलेली आहे त्यांनी जामखेड पोलीस स्टेशनला संपर्क करावा. सदरची कारवाई ही राकेश ओला पोलीस अधिक्षक अहमदनगर, प्रशांत खैरे, अपर पोलीस अधिक्षक अहमदनगर, विवेकानंद वाखारे, उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत विभाग यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश पाटील, सपोनि वर्षा जाधव, जामखेड शहर बीटाचे अंमलदार पोहेकॉ/प्रविण इंगळे, पो.ना. संतोष कोपनर, पो. ना. जितेंद्र सरोदे, पो. कॉ. प्रकाश मांडगे, पो.कॉ..कुलदिप घोळवे, पो.कॉ. देविदास पळसे, पो.कॉ. ज्ञानेश्वर बेल्हेकर, पो. कॉ. भगिरथ देशमाने, पो.कॉ. जिब्राईल शेख व सायबर सेलचे पो.कॉ. नितीन शिंदे व पो.कॉ. राहुल गुंडु यांच्या पथकाने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *