पाशा पटेलवर अखेर जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल
महिलांविषयी अश्लिल भाषेत बोलणारे भाजपा नेते पाशाभाई पटेल च्या फोटो काळे फासत चपलानी मारले
कर्जत- जामखेड विधानसभा मतदारसंघात आमदार प्रा. राम शिंदे यांच्या प्रचारासाठी गुरूवारी सायंकाळी जामखेड येथे सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी भाजपा नेते पाशाभाई पटेल यांनी अश्लिल हावभाव करत महिलांविषयी अर्वाच्य भाषेत बोलले यामुळे जामखेड शहरातील हजारो महिला पोलीस स्टेशन समोर जमल्या व पाशा पटेल याच्या फोटो ला काळे फासले व चपलानी मारले तसेच जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही असा पवित्रा महिलांनी घेतला.
चार तासाच्या आंदोलनानंतर अर्चना राळेभात यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीत म्हटले आहे की, विधानसभा निवडणूक 2024 चे उमेदवार राम शंकर शिंदे यांचे प्रचार सभा तहसील कार्यालयाजवळ, जामखेड या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. सदर सभा चालू असताना दिनांक 14.11.24 रोजी 19.00 ते 22.00 वाजातचे दरम्यान प्रचारसभेत मा. आ. पाशाभाई पटेल यांनी त्यांच्या भाषणात “सगळे मुसलमान पंजाला हातात धरतात, पंजानी मुसलमानाचे हातात…..” तोंडला थूका लावून हाताला चोळतात, कोणा कोणाची जिरवायची, ज्याला ज्याला जगायचे आहे त्यांनी कमळाला……(मतदान करा)” अशी वक्तव्य करताना अश्लील हातवारे व इशारे सार्वजनिक ठिकाणी केलेले आहेत.
आमदार प्रा. राम शिंदे यांच्या प्रचार सभेत पाशा पटेल यांनी अश्लिल हावभाव करत तसेच अश्लिल भाषेत महिलांविषयी अर्वाच्य भाषेत हावभाव करत अवमान केला यामुळे जामखेड मधील महिला खुपच आक्रमक झाल्या होत्या. यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावेळी अर्चना राळेभात, राजश्री मोरे, शिंदे मँडम, जयश्री वाळुंजकर, सम्रिन कुरेशी, सुनिता कोल्हे, सारिका चव्हाण, सारिका काळे, आशाबाई वीर, रोहिणी टकले, कुंदा गुळवे, सुनिता कांबळे, शोभा सुरवसे, सारिका गोरे, प्रिया राळेभात, सुनिता पोकळे, रेणुका साठे, वंदना शिंदे, स्वाती पोकळे, अलका गोरे, शहेबाज सय्यद, मंदा रसाळ, मुस्कान सय्यद, बिलकीस शेख, सना शेख, रजिया शेख, शेख अमिन, जीया शेख, बेबी शेख, सलिमा पठाण, सुलताना शेख, सुलताना शेख, शबाना शेख यांच्या सह हजारो महिला उपस्थित होत्या.
यावेळी बोलताना अर्चनाताई राळेभात म्हणाल्या की, राम शिंदे यांच्या प्रचार सभेत चार प्राध्यापक व्यासपीठावर होते त्यांना काहीच कसे वाटले नाही. राम शिंदे यांनी विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवावी असले अश्लिल हावभाव करणारे बोलणारे वाचाळवीर यांचा आम्ही महिला निषेध करतो शासनाने आपल्या जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर ठेवले आहे. अहिल्यादेवी च्या पावण भूमीत महिलांविषयी अर्वाच्य भाषेत बोलले जात आहे. याचा आम्ही सर्व महिला निषेध करतो व जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही. असा पवित्रा घेतल्याने अखेर गुन्हा दाखल करण्यात आला.