50 ते 55 वर्षीय व्यक्तीचा उष्माघाताने मृत्यू

50 ते 55 वर्षीय व्यक्तीचा उष्माघाताने एकाचा मृत्यू

सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांची मृत्यू पडलेल्या बेवारस वृद्धास मदत.

जामखेड प्रतिनिधी,

जामखेड पासून पाच किलोमीटर अंतरावर उष्माघाताने एका वृद्धाचा मृत्यू हकीगत आशिकी मंगळवार दिनांक २८/५/२०२४ रोजी दुपारी चार वाजता मोहा गावाजवळ पाईप फॅक्टरीच्या बाजूला एक माणूस उन्हात रोडवर पडलेला आहे अशी माहिती सुनील रेडे यांनी दिली माहिती समजताच सामाजिक कार्यकर्ते आपली रुग्णवाहिका घेऊन दीपक भोरे यास सोबत घेऊन घटनास्थळी भर उन्हाच्या पारात दाखल झाले घटनेची माहिती पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना संजय कोठारी यांनी दिली यावेळी महेश पाटील स्वतः घटनास्थळी दाखल झाले सोबत पोलीस कॉन्स्टेबल दीपक बोराटे ,कुलदीप गुळवे, शिवाजी भोस ,सचिन भापकर, पोलीस नाईक सरोदे आदींनी मदत केली

 

महत्त्वाचे म्हणजे साधारण ४३ डिग्री सेल्सिअस उन्हाचे तापमान असल्यामुळे या व्यक्तीस पिण्यास पाणी न मिळाल्याने उन्हाच्या तडाख्याने त्याचा मृत्यू झाला असावा असे सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी म्हणाले
त्याला उचलताना त्याच्या अंगाची सालटे निघाले होते त्यास संजय कोठारी यांनी आपल्या रुग्णवाहिकेत आणून जामखेड येथील शव गृहात टाकण्यात आले आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील करत आहेत.

 

 

तसेच जामखेड पोलीस स्टेशन च्या वतीने आवाहन
करण्यात आले आहे की बीड रोड हापटेवाडी ता. जामखेड गावचे शिवारात डोंगरे यांचे सिमेंट पाईपच्या कंपणी जवळ एक अनोळखी पुरूष जातीचे प्रेत वय अंदाजे 55 वर्ष हे बेवारस स्थिती मध्ये आढळून आले आहे सदर अनोळखी मयता बाबत कोणाला काय माहिती असेल तर जामखेड पोलीस स्टेशनला संपर्क साधावा
जामखेड पोलीस स्टेशन फोन. 02421 221033
पो.हे.कॉ.सरोदे मो. 9273003806
व संजय कोठारी सामाजिक कार्यकर्ते मो 9420800981
यांच्याशी संपर्क करावा.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page