जामखेड रोटरी क्लबतर्फे शिवजयंती उत्साहात साजरी…
जामखेड प्रतिनिधी –
जामखेड येथील रोटरी क्लबच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करून शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी विजय पवार व मयूर भोसले सर यांची रोटरी क्लबच्या सदस्यपदी निवड करण्यात आली. त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
कार्यक्रमाला रोटरीयन डॉ. प्रशांत गायकवाड, डॉ. उगले, डॉ. सादेख पठाण, डॉ. दळवी, डॉ. देवकर, डॉ. आबेद शेख तसेच ‘आशा द स्ट्रीट’चे संचालक प्रफुल्ल शेठ सोळंकी, श्री संभाजी मुळे व इतर सहकारी मित्रमंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव करण्यात आला व समाजहिताच्या उपक्रमांना चालना देण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.
![]()