**जामखेडमधील सराफ व्यावसायिकांना सराफ सुवर्णंकार संरक्षण समितीत महत्त्वाच्या जबाबदाऱ्या**
**जामखेड (प्रतिनिधी):
शहरातील प्रसिद्ध सराफ व्यावसायिक श्री. मोहनशेठ शंकरराव ढाळे, श्री. संकेत शेठ चंद्रकांत ढाळे आणि श्री. गणेश शेठ कालिदास वेदपाठक यांची भारतीय नरहरी सेना प्रणित ‘सराफ सुवर्णंकार संरक्षण समिती’च्या महत्त्वपूर्ण पदांवर निवड करण्यात आली आहे. श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाचे आमदार, माननीय विक्रमदादा बबनराव पाचपुते यांच्या शुभहस्ते या सर्वांना नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
भारतीय नरहरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष काकासाहेब बुऱ्हाडे, प्रदेशाध्यक्ष डॉ. राजेंद्रजी पिंगळे आणि महिला अध्यक्ष सौ. अर्चनाताई दिंडोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच समितीचे प्रदेशाध्यक्ष उमेशशेठ बुऱ्हाडे यांच्या आदेशानुसार या निवडी जाहीर करण्यात आल्या. उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष गणेशजी टाक यांच्या विनंतीवरून जिल्हाध्यक्ष ओंकारशेठ गटगिळे यांनी या नियुक्त्या केल्या.
या निवडीनुसार, श्री. मोहनशेठ शंकरराव ढाळे यांची उत्तर महाराष्ट्र प्रसिद्धी प्रमुखपदी, श्री. संकेत शेठ चंद्रकांत ढाळे यांची जामखेड तालुका अध्यक्षपदी आणि श्री. गणेश शेठ कालिदास वेदपाठक यांची जामखेड तालुका उपाध्यक्षपदी निवड झाली आहे.
या निवडीबद्दल राज्याचे कार्याध्यक्ष ॲड. विशालजी वेदपाठक, नगरसेवक अमितशेठ चिंतामणी, राज्य संपर्क प्रमुख अतुलजी पंडित, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष निलेशजी पंडित, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख मुकुंदजी निघोजकर, जिल्हा उपाध्यक्ष विनायकजी धारकर आणि जिल्हा संपर्क प्रमुख अक्षयनाथ शहाणे यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.