जामखेड तालुका कला शिक्षक संघटनेच्या अध्यक्षपदी मयूर भोसले यांची निवड.
जामखेड :-
अहिल्यानगर जिल्हा कला संघटनेचे पत्र (जा.न.5/2025दि 15-07-2025) नुसार जामखेड तालुक्याचे अध्यक्षपदी कलाशिक्षक मयूर कृष्णाजी भोसले यांची निवड सर्वानुमते करण्यात आली आहे.
जामखेड तालुका कलाशिक्षक संघटनेची दिनांक 12/07/2025 रोजी ल. ना. होशिंग माध्यमिक विद्यालय जामखेड येथे सहविचार सभा घेण्यात आली. या सभेत जेष्ठ कलाशिक्षक मुकुंद राउत यांनी अध्यक्षपदासाठी मयूर भोसले यांचा नावाचा ठराव मांडला याला राजन समिंदर यांनी सर्वांच्या वतीने अनुमोदन दिले व सर्व कला शिक्षकांच्या वतीने ठरावास मान्यता देण्यात आली या वेळी ज्येष्ठ कला शिक्षक मुकुंद राऊत ,संतोष सरसकर ,प्रकाश मिंड, शरद शिरसाट आदी मान्यवर उपस्थित होते.
या सभेचा अहवाल जिल्हा कला संघटनेस पाठवण्यात आला.
या सभेतील सर्वानुमते घेण्यात आलेल्या ठरावानुसार नवीन तालुका कार्यकारिणी निवडण्यात आली असून अहिल्यानगर कला शिक्षक संघटने पत्राने तालुका कार्यकारिणींना कळविण्यात आले.
कार्यकारिणी खालीलप्रमाणे…
अध्यक्ष – श्री मयूर कृष्णाजी भोसले
उपाध्यक्ष- श्री त्रिंबक बाबुराव लोळगे व श्री संतोष बन्सी म्हस्के
सचिव- श्री विकास बापुराव जाधव व श्री सूरज भास्कर डाडर
खजिनदार- श्री संजयकुमार सोमनाथ वस्तारे
महिला प्रतिनिधी- श्रीमती संगीता भुजंगराव दराडे
मार्गदर्शक- श्री दीपक साहेबराव तुपेरे व श्री रविंद्र दत्तात्रय कोरे
जिल्हा प्रतिनिधी- श्री अशोक दत्तात्रय बोराटे
यांची निवड करण्यात आली.
जिल्हा कला संघटनेचे संस्थापक माजी अध्यक्ष संजय पठाडे व जिल्हा अध्यक्ष रवींद्र गायकवाड
यांनी नवीन कार्यकारणीचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या व
जामखेड तालुका कला शिक्षक संघटना व कार्यकारिणीतील इतर सहकारी व तालुक्यातील कलाशिक्षकांच्या मदतीने तालुक्यात संघटना बळकट करण्याचा प्रयत्न करावा. तसेच कला विषय आणि कलाशिक्षक यांच्यासाठी विविध उपक्रम राबवावेत विद्यार्थी हिताचे कार्य करावे असे मनोगत व्यक्त केले.
विशेष बाब-
कला शिक्षक मयूर भोसले हे रयत शिक्षण संस्थेच्या नागेश विद्यालय मध्ये कार्यरत आहेत त्यांनी जामखेड तालुक्याचे नाव इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, अशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करून जागतिक पातळी चमकवले असून त्यांच्या कडे अध्यक्षपदाची धुरा देण्यात आली ही अभिमानाची बाब आहे.
सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
जामखेड तालुक्यात शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षा – जामखेड केंद्र 23 शाळा,खर्डा केंद्र 7 शाळा,नान्नज केंद्र 7 शाळा चित्रकला एलिमेंट्री व इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेसाठी आहेत..