जामखेड तालुका वकील संघ निवडणुकीचा निकाल जाहीर,अध्यक्षपदी श्री.अॅड.हर्शल एन.डोके यांची बाजी …

जामखेड तालुका वकील संघ निवडणुकीचा निकाल जाहीर,अध्यक्षपदी श्री.अॅड.हर्शल एन.डोके यांची बाजी …

जामखेड प्रतिनिधी .
जामखेड वकील संघाची सन 2026-2027 या वर्शासाठी दिनांक 26/02/2026 रोजी अध्यक्ष,
उपाध्यक्ष, सचिव, महिला सचिव, खजिनदार व ग्रंथपाल या पदा करीता निवडणुक पार पडली. निवडणुकी मध्ये अध्यक्ष म्हणुन अॅड.हर्शल एन.डोके यांची व उपाध्यक्ष म्हणुन अॅड. घनःशाम एम.राळेभात यांची बहुमताने निवड झाली, सचिव पदी अॅड.शिवाजी आ. लटपटे व खजिनदार पदी अॅड.सागर मोरे, यांनी देखील बाजी मारलेली आहे.

तसेच ग्रंथपाल पदी अॅड.एच.डी.सपकाळ व महिला सचिव पदी अॅड.वैश्णवी गोलेकर मॅडम यांची बिनविरोध निवड झाली,
वरील पदासाठी मतदान घेण्यात येवुन
अध्यक्षपदी अॅड.हर्शल एन.डोके व उपाध्यक्षपदी अॅड.घनःशाम एम. राळेभात, सचिव पदासाठी अॅड.शिवाजी लटपटे, खजिनदार पदासाठी अॅड.सागर मोरे हे विजयी झाले. तर ग्रंथपाल पदी अॅड.एच.डी.सपकाळ व महिला सचिव पदा साठी अॅड.वैश्णवी गोलेकर मॅडम यांची बिनविरोध निवड झाली.

निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन अॅड.पाटील व्हि.वाय यांनी काम पाहिले त्यांना सहाय् यक म्हणुन अॅड.नितीन घुमरे यांनी काम पाहिले.
सदरचे निवडणुकीत विजयी झालेले उमेदवारांचे अॅड.कोल्हे,अॅड.एस.आर.झरकर,अॅड.शेख ए.के.,अॅड.
एन.एल.बोरा, अॅड.प्रमोद राऊत, अॅड.संगाम पोले, नगरसवेक सभापती अॅड.प्रविण सानप, अॅड.गणेश पाटील, अॅड.चंद्रकांत ढाळे, अॅड.एन.के.घुमरे, अॅड.वराट, अॅड.दिलीप वारे, अॅड.टी.एस.पवार, अॅड.सुभाश जायभाय, अॅड.कात्रजकर, नगरसेवक, अॅड.अरूण जाधव, अॅड.काशिद, अॅड.कोरे, अॅड.गोले, अॅड.पारे, अॅड.अनिल काळे, अॅड. वाळुंजकर, अॅड.थोरात,अॅड.अनिल बारवकर,अॅड.एम.एन.नागरगोजे, अॅड.कारंडे, इतर सर्व वकील बांधवांनी अभिनंदन केले.


अॅड.हर्शल डोके या पुर्वीही दोन वेळा जामखेड वकील संघाचे निवडणुकीत निवडुण येवुन अध्यक्ष म्हणुन काम पाहिलेले आहे व त्यांनी त्यांचे कार्यकाळात जामखेड न्यायालयाचे नविन ईमारतीचे कामासाठी सर्व वकीलांना बरोबर घेवुन मोठे योगदान दिलेले आहे तसेच जामखेड येथे वकील संघाचे वतीने मोठ मोठे कार्यक्रम घेतलेले आहेत.त्यासाठी मा.ना.उच्च न्यायालयाचे न्यायाधिश यांना देखील आमंत्रित केलेले होते. त्यामुळे त्यांना सर्व जेश्ठ व कनिश्ठ वकीलांना बरोबर घेवुन काम करण्याचा अनुभव आहे व येथुन पुढे त्यांनी सर्व जेश्ठ वकीलांचे मार्गदर्शनाखाली व तरूण वकीलांचे साथीने काम करण्याचे ठरविलेले आहे.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page