जवळा येथे जवळेश्वर रथयात्रा मोठया उत्साहात साजरी.लाखो भाविकांनी घेतले जवळेश्वराचे दर्शन.
जामखेड प्रतिनिधी,
गुरूपोर्णिमेनिमित्त तालुक्यातील जवळा येथे श्री जवळेश्वर रथयात्रा मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त लाखो भाविकांनी रथयात्रेला हजेरी लावत, श्री जवळेश्वराचे दर्शन घेतले.
श्री जवळेश्वर रथयात्रा राज्यात प्रसिध्द असून, गुरूपोर्णिमेनिमित्त साज-या होणा-या रथयात्रेला वेगळे महत्व आहे. रथयात्रेनिमित्त सकाळी जवळेश्वर मुकुटाची आरती करून, रथामध्ये प्राणप्रतिष्ठापणा करण्यात आली. यावेळी भाविकांनी रथाचे दर्शन घेतानाच नारळाचे तोरण रथाला अर्पण केले. दुपारी एक वाजता रथाची महाआरती करून, मिरवणूकीस प्रारंभ करण्यात आला.
रथ मिरवणूक विठ्ठल मंदिर, बसस्थानक,मराठी शाळा,बाजारतळ मार्गे सायंकाळी सातच्या दरम्यान वेशीच्या आत आली. यावेळी मारूती मंदिरावर दहीहंडी फोडून, फटाक्यांची आतषबाजी करून आनंद व्यक्त करण्यात आला. रात्री बारा वाजणेच्या सुमारास रथयात्रा जवळेश्वर मंदिरासमोर आल्यानंतर हरहर महादेवाचा जयघोष होवून,यात्रेची सांगता झाली.
यात्रेनिमित्त महाआरतीला आमदार रोहित पवार , आमदार राम शिंदे यांच्या पत्नी व माजी सभापती आशा शिंदे, सामाजिक कार्षकर्ते निलेश गायवळ, जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात, राष्टवादीचे विधानसभा अध्यक्ष प्रा मधुकर राळेभात , बाजार समितीचे सभापती शरद कार्ले, माजी सभापती डाॅ.भगवान मुरूमकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पोलीस निरिक्षक महेश पाटील, सहाय्यक पोलीस निरिक्षक दिलीप तारडे यांनी यात्रेदरम्यान पाच दिवस चोख बंदोबस्त ठेवला होता.
जामखेड तालुक्यातील जवळा येथे श्री जवळेश्वर रथयात्रेनिमित्त लाखो भाविकांनी हजेरी लावली.