खर्डा प्रतिनिधी
खर्डा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुले येथे काही व्यक्ती जाणीवपूर्वक नुकसान करून शाळेचे झाड फुलांचे नुकसान करून लोखंडी वस्तूंच्या चोरी करत असल्याबाबतचे निवेदन खर्डा पोलीस स्टेशन येथे शाळेच्या वतीने देण्यात आले.
याबाबत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शशिकांत गुरसाळी, सचिव सचिन खरात, मुख्याध्यापक राम निकम यांनी खर्डा पोलीस स्टेशन येथे निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे की शाळेत काही अज्ञात व्यक्ती जाणीवपूर्वक नुकसान करतात, यामध्ये पिण्याच्या पाण्याच्या नळाच्या तोट्या चोळून नेने,झाडे तोडणे तसेच झाडे उपटून टाकने, झाडांच्या संरक्षण जाळ्या काढून घेऊन जाणे, फुल झाडे तोडणे अशा नुकसान होणारे कामे करतात. तसेच शाळेत काही झाडे, फुल झाडे लावण्यासाठी नवीन आणलेले चोरून नेले तर काही जाळे झाडे उपटून नेण्याचा प्रयत्न आढळून आले. नारळाची झाडे खोदून चोरून नेताना आढळून आले. या अशा अनेक छोट्या मोठ्या चोऱ्या शाळा व शाळा परिसरात होतात .मध्यंतरी येथील शाळेतील शाळेचा मुलांचा विद्यार्थ्यांचे शिकवण्याचा एलसीडी स्क्रीन प्रोजेक्टर चोरीचा प्रकार घडला होता.विद्येचे माहेरघर असलेल्या शाळेत विद्यार्थ्यांनी खूप आवडीने झाडे, फुल झाडे लावलेले सध्या सुट्टीचे दिवस असल्याने मुलं मुले शाळेत नसल्याने याचाच गैरफायदा घेऊन काही समाजकंटक नुकसान करत असल्याचे निवेदन देऊन या चोरांचा शाळेत होणाऱ्या त्रासाचा बंदोबस्त करण्याची मागणी शाळा व्यवस्थापन समिती, पालक व ग्रामस्थांनी केली आहे.
गतवर्षी शाळेतील झाडे उन्हात सुकू नये म्हणून त्यांना पाणी घालण्यासाठी एक विद्यार्थिनी सुट्टीत मामाच्या गावाला ही गेली नव्हती या विद्यार्थिनींचे शाळेने कौतुक केले होते.
शाळा सार्वजनीक विद्येचे माहेरघर आहे शाळेचे वातावरण खराब करीत असतील तर त्यांचा बंदोबस्त निश्चितच करू व या संदर्भात संबंधितांची माहिती घेऊन त्याच्यावर कार्यवाही करून उपाययोजना करण्यात येईल.
महेश जानकर
सहा. पोलीस निरीक्षक खर्डा पोलीस स्टेशन
विद्यार्थी ,पालक व ग्रामस्थांनी वर्गणी करून शाळेच्या विकासासाठी मदत केली. यामध्ये शाळेचा सर्वांगीण विकास चालू आहे त्याचे नुकसान होत असेल तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर याचा परिणाम होऊ नये याची खबरदारी घेतली पाहिजे, शाळा, शाळेची वस्तू व शाळा परिसराचे संरक्षण करणे हे विद्यार्थी पालक यांच्यासह ग्रामस्थांचे आहे .
शशिकांत गुरसाळी
अध्यक्ष
शाळा व्यवस्थापन समिती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुले