जून्या बसेस मोडकळीस,जामखेड आगार येथे नवीन बस मिळाव्यात – पांडुरंग माने
जामखेड प्रतिनिधी,
जामखेड आगार येथे जून्या बसेस मोडकळीस आलेल्या आहेत. यामुळे नागरिकांची हेळसांड होऊन हाल होत आहे. या विषयाकडे विभागीय कार्यालयाचे विभाग नियंत्रक यांनी लक्ष घालावे.एक महिन्यापूर्वी तारकपूर एस टी आगाराने जुने टायर टाकून खिळखिळ्या जुन्या ५ बसेस पाठवले आहे.व त्या देखील व्यवस्थित चालत नाहीत,नवीन २० बसेस जामखेड आगार डेपो येथे देण्यात यावे. या मागणीसाठी पांडुरंग माने ( विभाग प्रमुख, भटके विमुक्त जाती, जमाती उत्तर महाराष्ट्र व मराठवाडा) यांनी जामखेड येथे दि. १२ मार्च रोजी जामखेड आगार प्रमुख यांना निवेदन दिले आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका सरचिटणीस प्रकाश काळे, उमेश राळेभात, नितीन राऊत आदी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की,सध्या जामखेड आगार येथे १५ बसेस आहेत. त्यातील ५० बसेस चालू आहेत. २०१९ मध्ये जामखेड आगार कड़े ६७ बसेस कार्यरत होत्या. २०१९ पासून जामखेड आगार येथून बरेचसे मार्ग विस्कळीत झालेले आहेत.
बस चा कालावधी १५ वर्षांपर्यंत महाराष्ट्र शासनाचा निर्णय असून ५० पैकी १० बसेस चा २-४ महिन्यात कालावधी संपत आहे. तरी आपण पाथर्डी आगाराला १० नवीन बसेस दिल्या त्याप्रमाणे जामखेड आगारास नवीन २० बसेस दि.०१/०४/२०२५ पर्यंत मिळाव्यात अशी मागणी करण्यात आली आहे अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे