*कालिका पोदार लर्न स्कूल च्या “एक शाम सितारों के साथ ” वार्षिक स्नेहसंमेलन या कार्यक्रमाची जामखेड मध्ये धमाल.*

*कालिका पोदार लर्न स्कूल च्या “एक शाम सितारों के साथ ” वार्षिक स्नेहसंमेलन या कार्यक्रमाची जामखेड मध्ये धमाल.*

जामखेड प्रतिनिधी,

जामखेड शहरातील एकमेव अशा सी.बी.एस.ई. मान्यताप्राप्त कालिका पोदार लर्न स्कूल मध्ये यावर्षीचा वार्षिक स्नेहसंमेलन उपरोक्त शिर्षकाखाली पार पडलेल्या विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमाने जामखेडकर सुखावले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.श्रीमती विमला एम. ( आय.पी.एस.) कमांडंट एसआरपीएफ गृप -१९, कुसडगांव तर प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री.उज्ज्वलसिंग राजपूत एपीआय खर्डा पोलिस स्टेशन जामखेड व इतर यांच्या उपस्थितीत हजारोंच्या संख्येने दि.२४ डिसेंबर रोजी सायं. ५ वाजता शाळेच्या प्रांगणात यशस्वीपणे पार पडला.

कार्यक्रमाची अद्भुत सुरुवात विद्यार्थ्यांनी सांगितिक वाद्यवृद्यांच्या म्युझिकल फिस्ट या कार्यक्रमाने तर बाॅलिवुडमधील प्रसिद्ध गाण्यांवर चिमुकले पाऊल जोरदारपणे थिरकले तर मध्ये-मध्ये काही नाटिकेद्वारे विद्यार्थ्यांनी प्रेक्षकांची मने वारंवार जिंकली.

हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शाळेचे संस्थापक व प्राचार्य श्री कुंदन नेमाडे,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या तसेच सर्व विद्यार्थ्यांनी घेतलेल्या कष्टाचे सर्वदूर कौतुक होत आहे.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page