*कालिका पोदार लर्न स्कूलची विज्ञान प्रदर्शनात बाजी*
*कालिका पोदार लर्न स्कुलच्या विध्यार्थ्यांनाचा राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात डंका*
जामखेड प्रतिनिधी:
नुकतीच राज्य विज्ञान शिक्षणसंस्था रविनगर, पुरस्कृत व पंचायत समिती जामखेड व तालुका गणित-विज्ञान शिक्षक संघटना जामखेड. यांच्या संयुक्त विद्यमाने जामखेड तालुका विज्ञान गणित प्रदर्शन 2024-25 मोहा येथे संपन्न झाले.या प्रदर्शनात कालिका पोदार लर्न स्कूलच्या विद्यार्थीनींनी भरघोस यश संपादन केले.
या प्रदर्शनात संपुर्ण तालुक्यातील विद्यार्थ्यांनी विविध प्रकल्प तयार करून सादर केले होते.यामध्ये कालिका पोदार लर्न स्कूलचे गणित व विज्ञान या विषयाचे प्रकल्प होते .यामध्ये इयत्ता सहावी ते आठवी या गटामध्ये कुमारी आर्या बाळासाहेब औटे,या विद्यार्थीनींने गणित या विषयामध्ये प्रथम क्रमांक पटकवला,तसेच कुमारी समृद्धी बाळासाहेब पेचे हिने विज्ञान प्रदर्शनात तृतीय क्रमांक पटकवला.
व जिल्हास्तरावर होणा-या स्पर्धेसाठी निवड झाली. या प्रसंगी गटविकास अधिकारी श्री शुभम जाधव यांच्या हस्ते प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आली.या वेळी गटशिक्षणाधिकारी श्री विजय शेवाळे,मुख्याधिकारी श्री अजय साळवे,सांख्यिकी विस्तार अधिकारी श्री कैलास खैरे,श्री बबन काशिद,यांच्या सह अनेक मान्यवर शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.
या विद्यार्थ्यींचे शाळेचे प्राचार्य श्री प्रशांत जोशी सर तसेच कालिका पोदार लर्न स्कूलचे संस्थापक श्री सागर अंदुरे, श्री निलेश तवटे यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ही दिल्या.