कालिका पोदार लर्न स्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश
जामखेड प्रतिनिधी,
कालिका पोदार लर्न स्कुल चे विद्यार्थी व स्कुल विविध खेळामध्ये स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवत असतात नुकत्याच जिल्हा स्थरीय शालेय सेपाक टकरा या खेळाच्या स्पर्धा अहिल्यानगर येथे पार पडल्या .या स्पर्धेसाठी जिल्ह्यातील विविध स्तरातून अनेक संघानी उपस्थिती नोंदवली होती.
जिल्हा क्रिडाधिका-यांच्या उपस्थितित सामन्यांना सुरुवात झाली. विविध खेळाडूंनी आपले सर्व कौशल्य पणाला लावून कमालीची शर्त केली.
यामध्ये कालिका पोदार लर्न स्कूलच्या संघाने आपले कौशल्य दाखवत अंतिम फेरीत पदार्पण केले.सुंदर खेळाचे प्रदर्शन केले व कालिका पोदार लर्न स्कूलचा संघ उपविजेता ठरला .या संघामध्ये कु. सेजल तवटे,कु.श्रेया सुपेकर,कु.अदिती गटकळ,कु.पलक भोरे,कु.ट्विन्सी कुकरेजा या खेळाडुंचा सामावेश होता.
या संघासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री कुंदन नेमाडे सर,सर्व शिक्षक वृंद व शाळेचे सर्व संस्थापक यांनी विशेष अभिनंदन केले.तसेच विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.