शहरातील सद्दाम शेख याने कार्डियाक रुग्णवाहिका आणून जामखेडच्या वैभवात भर पाडली सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी
जामखेड प्रतिनिधी,
आज दिवाळीनिमित्त जामखेड शहरात कारडीयाक ॲम्बुलन्स असणे खूप मोठी बाब आहे कारण अपघाताचे प्रमाण वाढले आहे जामखेड वरून नगरला जाताना रोड खराब असल्यामुळे अनेक पेशंट दगावले गेले आहे आत्ताच एका लक्झरी बसचा अपघात झाला त्यामध्ये नगरला जाईपर्यंत काही जणांचा मृत्यू झाला रोड खराब आहेत आणि ॲम्बुलन्सची गरज आहे आता ही ॲम्बुलन्स आल्याने अनेकांचे प्राण वाचतील असे मत सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी मांडले
आज दिवाळी निमित्त संजय कोठारी यांच्या हस्ते गाडीची पूजा करून गाडीची सुरुवात करण्यात आली यावेळी सद्दाम शेख ला संजय कोठारी यांनी गाडीची माहिती विचारले असता या गाडीमध्ये व्हेंटिलेटर, पाच प्यारा मॉनिटर, डी फेब मशीन, सिरीज पंप, सक्शन मशीन, ऑक्सिजन सुविधा, आईस बॉक्स ,यु. व्हि.स्टरलायझर मशीन, सेंट्रल एअर कंडिशन तज्ञ डॉक्टर, अनुभवी स्टाफ हे या गाडीमध्ये असणार आहे
आणि संजू काका एखाद्या गरीबाची परिस्थिती नसेल तर मी त्यास मदत करील असे आश्वासन गाडी मालक सद्दाम शेख यांनी दिले यावेळी आशिष बोथरा, अमित पिपाडा आधी उपस्थित होते