ऐतिहासिक खर्ड्याच्या लढाईला झाले दोनशे तीस वर्षे पूर्ण…

लढाईतील शुरवीर योध्दांना शिवप्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आली मानवंदना..

जामखेड प्रतिनिधी

खर्डा येथील विजयाला २३० वर्ष पुर्ण; लढाईतील शुरवीरांना श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान खर्डा यांच्यावतीने देण्यात आली मानवंदना.

जामखेड तालक्यातील खर्डा येथील विजयाला २३० वर्ष पुर्ण झाली. ही विजयी लढाई ११मार्च १७९५ रोजी संपुन मराठ्यांच्या विजय घोषित करण्यात आला. त्यानिमित्ताने आज दि. ११ मार्च रोजी खर्डा येथील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान शाखेच्या वतीने या लढाईतील शुरवीरानां मानवंदना देत शिवछत्रपतींच्या मुर्तीचे पुजन करुन जयघोष करण्यात आला. तसेच विजय दिन मराठाशौर्य दिनानिमित्ताने किल्ल्यावर भगवा ध्वज लावण्यात आला. याबरोबरच खर्डा येथूनच १५ किलो मीटर अंतरावर दौंडवाडी येथील रणटेकडीवरदेखील भगवा ध्वज लावुन जयघोष करुन मानवंदना देण्यात आली.

 

या दोन्ही ऐतिहासिक स्थळांचा उत्कृष्ट पध्दतीने विकास व्हावा आणि हा वारसा पिढ्यानपिढ्या जतन व्हावा हिच अपेक्षा शिवप्रेमींनी तसेच श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान जामखेड तालुका यांचेवतीने करण्यात आली. या दोन्ही ठिकाणी वेळोवेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान जामखेड तालुक्याच्यावतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात येते. तसेच किल्यावर तोफही बसवण्यातआली असुन किल्ल्यात सापडलेले तोफ~ गोळे व्यवस्थित रहावे म्हणून लोखंडी गेट बसवून तोफगोळे सुरक्षित ठेवण्यात आले आहेत.
राज्याचा पुरातत्व विभाग खर्डा किल्ल्याकडे वेळोवेळी दुर्लक्ष करत आहे. अनेक वेळा मागणी करूनही किल्ल्याच्या गेटवर पुरातत्व विभागाकडून अजुनही शिपाई ठेवण्यात आलेला नाही. विधान परिषद सभापती आमदार प्रा. राम शिंदे व आमदार रोहित पवार यांनी किल्ल्याच्या विकासाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. इतिहासात खर्डा लढाई ही मराठ्यांच्या पराक्रमाच्या शौर्याची आणि विजयाची म्हणून ओळख असलेली लढाई आहे. आज ११ मार्च २०२५ रोजी या लढाईला २३० वर्ष पूर्ण झाली आहे. यानिमित्ताने सर्व धारकरी शिवप्रेमीनीं तसेच सर्वपक्ष पदाधिकारी यांनी पुजन करुन मानवंदना देण्यात आली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *