खर्डा परिसरात अनोळखी वृद्ध महिलेचा मृतदेह आढळला– रहस्यमय घटनेचा तपास सुरू, परिसरात एकच खळबळ
जामखेड तालुक्यातील खर्डा पोलीस ठाणे हद्दीतील माळेवाडी शिवार परिसरात आज (दि.13 ऑक्टोबर 2025) दुपारी एका अनोळखी वृद्ध महिलेला मृत अवस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी सुमारे 12 वाजण्याच्या सुमारास मांजरा नदीच्या काठावर वैजिनाथ भगवान रंधवे यांच्या शेतात पाण्यात वाहून आलेले एका स्त्री जातीचे प्रेत आढळले.ही माहिती पोलीस पाटील राजेंद्र छगन गिते (वय 45 वर्ष, रा. दिघोळ) यांनी खर्डा पोलीस ठाण्यात दिली.

त्यांनी सांगितले की, मांजरा नदीच्या प्रवाहामध्ये वाहून आलेल्या एका वृद्ध स्त्रीचा मृतदेह शेतामध्ये अडकलेला दिसला. लगेचच त्यांनी गावातील लोकांच्या मदतीने ही माहिती पोलिसांना कळवली.प्राथमिक तपासात संबंधित स्त्रीचे नाव, गाव व ओळख याबाबत कोणतीही माहिती अद्याप मिळालेली नाही.

या अनोळखी महिलेचे वय अंदाजे 60 ते 70 वर्षे असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू आहे.खर्डा पोलीस ठाण्यात या घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद A.M.R. रजिस्टर क्रमांक 32/2025 अंतर्गत भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 194 प्रमाणे करण्यात आली आहे.

पोलीस उपनिरीक्षक उज्वलसिंह राजपुत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार एस.एस. जायभाये हे तपास करत आहेत.पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, सुमारे 60-70 वर्षांच्या महिलेचा मृतदेह आढळल्याने जर आपल्या परिसरात कोणतीही वृद्ध स्त्री हरवली असल्याची नोंद तक्रार किंवा मिसिंग रिपोर्ट असेल तर ती माहिती द्यावी

खर्डा पोलीस ठाण्यास कळवावी. पोलिसांशी संपर्कासाठी खालील क्रमांकांचा उपयोग करावा:पोहेकॉ एस.एस. जायभाये: 9923374263सपोनि. उज्वलसिंह राजपुत: 9637053052खर्डा पोलीस स्टेशन फोन: 02421–240233ईमेल: ps.kharda.anr@mahapolice.gov.inया घटनेमुळे स्थानिकांमध्ये चिंतेचे वातावरण असून पोलिसांनी हा मृत्यू अपघाती की अन्य कारणांनी झाला याबाबत तपास सुरू केला आहे. मृतदेह ओळख पटविण्यासाठी परिसरातील पोलीस ठाण्यांना माहिती देण्यात आली आहे.
