नागेश्वराच्या पावन भूमीत सालाबाद प्रमाणे कै.विष्णू (उस्ताद) काशीद बाबा यांच्या स्मरणार्थ याही वर्षी जामखेड येथे भव्य दिव्य विराट निकाली कुस्त्यांच्या जंगी मैदानाचे आयोजन मा.अजय (दादा) काशीद मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

नागेश्वराच्या पावन भूमीत सालाबाद प्रमाणे कै.विष्णू (उस्ताद) काशीद बाबा यांच्या स्मरणार्थ याही वर्षी जामखेड येथे भव्य दिव्य विराट निकाली कुस्त्यांच्या जंगी मैदानाचे आयोजन मा.अजय (दादा) काशीद मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

जामखेड जामखेडचा,

_*या भव्य जंगी कुस्ती मैदानासाठी उद्घाटक म्हणून महाराष्ट्र राज्याचे विधान परिषदेचे सभापती मा.प्रा.राम शिंदे साहेब हे उपस्थित राहणार असून, प्रमुख पाहुणे म्हणून ह.भ.प.महादेवानंद भारती महाराज (अश्वलिंग संस्थान पिंपळवंडी) , श्री श्री 1008 महामंडलेश्वर नितीन दासजी महाराज,मा.श्री राधाकृष्ण विखे पाटील (पालकमंत्री अहिल्यानगर), मा.श्री.सुरेश (आण्णा) धस (आमदार आष्टी पाटोदा शिरूर), मा.श्री.दिलीप (दादा) जगताप (राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय मराठा महासंघ) , हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.सदर भव्य दिव्य कुस्ती मैदानाचे आयोजन मा.पै.बबन (काका) काशिद (उपमहाराष्ट्र केसरी तथा अध्यक्ष मल्लविद्या संस्कार कुस्ती फाउंडेशन महाराष्ट्र) & मा.श्री.युवराज (भाऊ) काशिद (अध्यक्ष,मराठी भाषिय संघ मध्य प्रदेश) यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली संपन्न होत आहे.*_

_*या कुस्ती मैदानामध्ये क्रमांक एकची मानाची कुस्ती पै.सतपाल सोनटक्के (शिवनेरी अकलूज) विरुद्ध पै. कालीचरण सोलनकर (गंगावेस कोल्हापूर) यांच्यामध्ये मानाच्या गदेसाठी अंतिम कुस्ती होणार असून, त्यानंतर नावाजलेले पै.भैया धुमाळ (अकलूज) विरुद्ध पै.फैयाज हुसेन (इंदोर) तसेच पै.सुरेश मुंडे विरुद्ध पै.प्रमोद सुड (कुर्डवाडी) यांच्यामध्ये अटीतटीच्या व चुरशीच्या कुस्त्या होणार आहेत. यासोबतच तालुका जिल्हा व परिसरातील नावाजलेल्या पैलवानांच्या कुस्त्या या ठिकाणी कुस्ती शौकिनांना पाहायला मिळणार आहेत. या कुस्ती मैदानामधील होणाऱ्या सर्व कुस्त्या कुस्ती मैदानाच्या दिवशी सकाळी 9 ते 12 या वेळेत नेमल्या जातील.नंतर कुठलीही कुस्ती ग्राह्य धरली जाणार नाही.तरी या कुस्ती मैदानासाठी उपस्थित राहणाऱ्या पैलवानांनी आपल्या नावाची नोंद संयोजकाकडे कुस्ती मैदानाच्या दिवशी सकाळी 9 ते 12 या वेळेत करावी.तरी या भव्य जंगी मैदानासाठी कुस्ती शौकिनांनी मोठ्या संख्येने उपस्थित कुस्त्यांचा आनंद घ्यावा असे आवाहन या मैदानाच्या आयोजक अजय (दादा)काशीद मित्र परिवाराच्या वतीने करण्यात येत आहे.*_

_*कुस्ती मैदानाचे हे सलग 23 वे वर्ष असून या कुस्ती मैदानामध्ये यापूर्वी ही नावाजलेल्या मल्लांच्या कुस्त्या झालेले आहेत. या मैदानामध्ये कुस्ती केलेले मल्ल पुढे चालून मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये यशस्वी झालेले आहेत. ही या मैदानाची आगळीवेगळी ओळख असून, आजच्या या कुस्ती मैदानामध्ये जामखेडचा सुपुत्र पै.सुजय तनपुरे (आशियाई चॅम्पियन सुवर्णपदक विजेता) यांचाही सन्मान केला जाणार आहे. तरी या कुस्ती मैदानासाठी सर्व कुस्ती शौकीनांनी, मित्रपरिवारांनी उपस्थित रहावे असे आवाहन मा.श्री.अजय (दादा)काशीद (अध्यक्ष कै.विष्णू (उस्ताद) काशीद प्रतिष्ठान जामखेड तथा माजी तालुकाध्यक्ष भाजपा जामखेड ) यांच्या वतीने करण्यात येत आहे.*

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page