मा मनोज जरांगे पाटील यांनी जामखेड येथील तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या साखळी उपोषणस्थळी भेट देत आंदोलनाला जाहीर पाठिंबा

मा मनोज जरांगे पाटील यांनी जामखेड येथील तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या साखळी उपोषणस्थळी भेट देत आंदोलनाला जाहीर पाठिंबा

जामखेड प्रतिनिधी —

मनोज जरांगे पाटील यांनी जामखेड येथील तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या साखळी उपोषणस्थळी भेट देत आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला असून
सामाजिक कार्यकर्ते अवधूत पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय महामार्गावरील अनाधिकृत अतिक्रमण आणि कामातील अनियमिततेविरोधात मागील काही दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे.

उपोषणामागील भूमिका जाणून घेतल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग असून मराठवाड्याचे प्रवेशद्वार आहे, त्यामुळे रस्त्यालगतची वाढती अतिक्रमणे तातडीने हटवलीच पाहिजेत. नागरिकांच्या न्याय्य मागण्यांसाठी आपण त्यांच्या पाठिशी ठाम उभे आहोत, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.

दरम्यान संबंधित अधिकाऱ्यांसोबत सभापती राम शिंदे यांची बैठक होणार असल्याची माहिती मिळाली असून, त्या बैठकीतील निर्णयानुसार पुढील भूमिका जाहीर केली जाईल, असेही त्यांनी नमूद केले. या आंदोलनाला विविध सामाजिक संघटना व नागरिकांचा वाढता प्रतिसाद मिळत असल्याने परिसरात या विषयाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page