*मराठा क्रांती मोर्चा जामखेड तालुक्याच्या वतीने आमदार प्रा.राम शिंदे साहेब यांना निवेदन.*

*मराठा क्रांती मोर्चा जामखेड तालुक्याच्या वतीने आमदार प्रा.राम शिंदे साहेब यांना निवेदन.

जामखेड प्रतिनिधी,

जामखेड येथे आयोजित मराठा आरक्षण जागर सभेनिमित्त मराठा योद्धा श्री.मनोज जरांगे पाटील यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. प्रसंगी आजच्या या सभेकरिता असंख्य मराठा बांधव सहभागी झाले होते. तसेच आमदार प्रा राम शिंदे साहेब हे देखील सहभागी झाले होते. या ठिकाणी मराठा समाजाच्या आरक्षण तसेच विविध मागण्यांचे निवेदन हे आमदार प्रा राम शिंदे साहेब यांना देत एक जबाबदार लोकप्रधिनी म्हणून समाजाचे प्रश्न हे सरकार दरबारी मांडावेत व समाजातील गरीब युवकांना त्यांच्या उज्वल भविष्यासाठी आरक्षण किती गरजेचे आहे याची जाणीव करून द्यावी याकरिता हे निवेदन देण्यात आले. साहेबांनी देखील या ठिकाणी सर्वांना आश्वस्त करत आपण सरकार दरबारी आपल्या मागण्या मांडण्याकरिता कटिबद्ध आहे असे आश्वासन दिले.

प्रसंगी उपस्थित प्रा सचिन सर गायवळ, आण्णासाहेब सावंत, डाॅ भगवान मुरुमकर,सभापती पै शरद  कार्ले ,रवी सुरवसे, बापु ढवळे,पवन राळेभात,सोमनाथ राळेभात,बिभिषन धनवडे, राहुल उगले,डिगांबर चव्हान विजयसिंह गोलेकर, आदी उपस्थित होते.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page