आता सर्वसामान्यांच्या हितासाठी यापुढे जिल्हा सहकारी बँकेत लक्ष घालणार : विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे
ना. प्रा. राम शिंदे यांचा जिल्हा सहकारी बँकेत लक्ष घालण्याचा निर्णय स्वागतार्ह : पै. शरद कार्ले
जामखेड प्रतिनिधी,
अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकत सर्वसामान्याचे, शेतकऱ्याचे नेते शिवाजीराव कर्डिले यांच्या नेतृत्वात सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देते आहे त्यामुळे हि बँक सर्वसामान्यांना, शेतकऱ्यांना आपली वाटते त्यामुळे मी कधीही बँकेत लक्ष दिले नाही परंतु आता मात्र मला लक्ष दिले पाहिजे असे मला वाटते. असे म्हणत मी आता जिल्हा सहकारी बँकेत ही सर्वसामान्याच्या हितासाठी लक्ष देणार, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी केले आहे. त्यांनी सुचीत केलेला हा निर्णय स्वागतार्ह आहे, असे प्रतिपादन जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पै. शरद कार्ले यांनी केले आहे.
हे वक्तव्य जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारे आहे. त्यांच्या या वाक्यातील खोच जाणकारां बरोबरच त्यांच्या मतदार संघातील सर्वसामान्य लोकांना जाणवल्या शिवाय राहणार नाही, आतापर्यंत ना. शिंदे यांचे राजकारण अगदीच सरळ आहे आणि शक्यतो जिरवा जिरवी या नगरी डावापासून कोसो दूर होते. परंतु गेल्या विधानसभा निवडणुकीत तांत्रिक कारणाने झालेला पराभव त्यानंतर मतदार संघातील ज्या काही सहकारी संस्था आहेत त्यामध्ये शिजत असलेले राजकारण आणि त्यातूनच तत्कालिक कारण म्हणजे जिल्हा सहकारी बँकेच्या वार्षिक ताळेबंद अहवालात फोटो नसणे. अशा कुरघोडीचा ना. शिंदेना राजकारणातील उपद्रव मूल्यांचा कडवट अनुभव आला.

काही कार्यकर्त्यांवर कितीही निस्वार्थी प्रेम केले, कोणतीही मनात अढी न ठेवता त्यांना मानसन्मान दिला प्रसंगी निष्ठावंतावर अन्याय झाल्याची कार्यकर्त्यांची भावना झाली तरीही ना. शिंदे यांनी सूडाचे राजकारण कधीही केले नाही पण त्यांना प्रस्थापितांच्या कुरघोडीचा सामना राजकारणात करावा लागत आहे त्यामुळे निष्ठावंत आणि पक्षीय तत्व मानणाऱ्या कार्यकर्त्यांची कुंचबणा होत आहे. अशा परिस्थितीत अहिल्यानगरच्या राजकारणात एवढे मोठे संवैधानिक पद असूनही कुरघोडी करत कोणी जिल्ह्याच्या राजकारणात अदखलपात्र ठरवत असेल तर त्यावर उपाय ही राम शिंदे यांनी शोधला असेच म्हणावे लागेल.
ना. शिंदे यांच्या या वक्तव्यामुळे आगामी निवडणूक म्हणजेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत निष्ठावंत कार्यकर्त्यावर अन्याय होणार नाही याची जणू ग्वाहीच या जाहीर वक्तव्यामुळे मिळते. सर्वच पक्षातील पक्षांतर्गत कुरघोडी करत सतत असंतुष्ट असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या तिसऱ्या आघाडीच्या भिती दाखवत वेठीस धरणाऱ्या कार्यकर्त्यांच्या या भोकाडीचा आता उपयोग होणार नाही असाही या वक्तव्याचा अर्थ होतो.
सभापती शिंदे यांच्या वक्तव्याने एकाच दगडात बरेच पक्षी मारण्याचा दणका दिला आहे. विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी जिल्हा बँकेसंदर्भात घेतलेल्या या भुमिकेने आगामी काळात अहिल्यानगर जिल्ह्यातील राजकारणात अनेकांना अनपेक्षीत धक्के बसू शकतात. असा विश्वास कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पै. शरद कार्ले यांनी व्यक्त केला आहे.