जेष्ठ नेते प्रा मधुकर (आबा) राळेभात यांनी भाजपात यावे, आमदार प्रा राम शिंदे यांच्याकडून प्रा राळेभात यांना खुले निमंत्रण !

जामखेड प्रतिनिधी,

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे कर्जत जामखेड विधानसभा प्रमुख तथा जामखेड तालुक्याचे जेष्ठ नेते प्रा मधुकर (आबा) राळेभात यांनी रोहित पवारांच्या हुकुमशाही कार्यपध्दतीला कंटाळून पक्षाचा राजानामा देण्याची घोषणा केली होती. राष्ट्रवादीतून बाहेर पडल्यानंतर राळेभात हे कुठल्या पक्षात जाणार याची उत्सुकता शिगेला पोहचलेली असतानाच राज्याचे माजी मंत्री तथा आमदार प्रा.राम शिंदे यांनी प्रा मधुकर (आबा) राळेभात यांनी भाजपात यावे असे खुले निमंत्रण दिले आहे.

जामखेड तालुक्याचे जेष्ठ नेते प्रा मधुकर (आबा) राळेभात यांनी दोन दिवसापुर्वी पत्रकार परिषद घेवुन राष्ट्रवादी काँग्रेस (SP) पक्षाचा राजीनामा दिल्याची घोषणा केली आहे. पक्षातून बाहेर पडताना प्रा राळेभात यांनी आ रोहित पवारांच्या हुकूमशाही कार्यपध्दतीवर सडकुन टिका केली होती. प्रा मधुकर राळेभात हे जामखेड तालुक्याच्या राजकारणातील महत्वाचे नेते आहेत. त्यांच्याकडे मोठा जनाधार आहे. सर्वसामान्य जनतेत लोकप्रिय असलेल्या प्रा मधुकर राळेभात यांच्यासारख्या जेष्ठ नेता आपल्या पक्षात असावा अशी सर्वच राजकीय पक्षांची पसंती असते. प्रा राळेभात यांनी भाजपात यावे यासाठी आमदार प्रा राम शिंदे यांनी कंबर कसली आहे. शिंदे यांनी सोशल मिडीयावर पोस्ट लिहीत राळेभात यांनी भाजपात यावे असे खुले निमंत्रण दिले आहे. जेष्ठ नेते प्रा मधुकर राळेभात यांच्यासारखा महत्वाच्या नेत्याला भाजपात घेण्यासाठी आमदार प्रा.राम शिंदे यांनी पुढाकार घेतल्याचे यातून स्पष्ट होत आहे.

प्रा मधुकर राळेभात यांचा सामाजिक,शैक्षणिक, राजकीय व सार्वजनिक क्षेत्रातील अनूभव खूप मोठा आहे. ते कायम सामाजिक कार्यात सक्रिय असतात. प्रा मधुकर राळेभात यांनी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम केल्यानंतर त्यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणूनही काम केले. त्याचबरोबर त्यांनी २००९ ची विधानसभा निवडणूक लढवत जामखेड तालुक्यात क्रमांक १ ची मते मिळवली होती. जामखेड तालुक्याच्या राजकारणातील जेष्ठ नेते म्हणून त्यांची ओळख आहे.

कर्जत जामखेडच्या विकासासाठी आणि स्वाभिमानासाठी प्रा मधुकर (आबा) राळेभात हे भारतीय जनता पार्टीत आल्यास त्यांचा योग्य तो मान सन्मान राखला जाईल, अशी उघड भूमिका आमदार प्रा राम शिंदे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये मांडली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *