आमदार राम शिंदेंना मोठा धक्का….आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली भाजप पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

 

कर्जत जामखेड ता.३१ –

कर्जत जामखेडमधील शेकडो भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आमदार राम शिंदे यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ‘राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार’ पक्षामध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला. भाजप पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रवेश केल्याने आमदार रोहित पवार यांनी राम शिंदे यांना मोठा धक्का दिल्याचं बोलले जात आहे.

कर्जत जामखेड मतदार संघाची 2024 ची विधानसभेची निवडणूक ही आमदार रोहित पवार यांनी गेल्या पाच वर्षात केलेल्या विकासकामामुळे आणि सर्वसामान्य जनतेची केलेली कामे यामुळे एकतर्फी असल्याचं सर्व सामान्य जनतेचे मत झाले आहे. ही निवडणूक म्हणजे रोहित पवार यांच्या विजयाची केवळ औपचारिकता असल्याचे निश्चित मानले जात आहे.

आमदार राम शिंदे यांच्या कार्यपद्धतीला वैतागून शिंपोरा, खेड, कवडगाव या गावातील भाजपच्या पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे.

आमदार रोहित पवार यांनी या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर, युवा नेते मंगेश आजबे यांच्यासह हरिश्चंद्र भोईटे, बंटी चोरखले, सलाउद्दीन सय्यद, दत्तू भोरे, बलभीम चोरखले, संपत ढेपे, आबासाहेब येवले, जालिंदर शेगडे इ. यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *