*संजय राऊतांची तोफ मंगळवारी १० वाजता जामखेडमध्ये धडाडणार*
*१२ तारखेला विरोधकांचे वाजवणार बारा*
*आमदार रोहित पवार यांच्या प्रचारार्थ भव्य ‘मताधिक्य मेळावा’*
कर्जत-जामखेड ता. १०-
शिवसेनेची बुलंद तोफ आणि रोज सकाळी १० वाजता मिडियासमोर येऊन भाजप युतीची दाणदाण उडवून टाकणारे शिवसेनेचे फायरब्रॅड नेते संजय राऊत हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आणि महाविकासआघाडीचे कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार कार्यसम्राट आमदार रोहित पवार यांच्या प्रचारार्थ आयोजित मताधिक्य मेळाव्याला उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. रोज मुंबईतून धडाडणारी त्यांची तोफ मंगळवारी सकाळी १० वाजता जामखेडमधून धडाडणार असून यातून कोणाचे इमले उध्वस्त होतात याकडे सर्वांचं विशेषतः कर्जत जामखेडमधील मतदारांचं लक्ष लागले आहे.
आमदार रोहित पवार यांनी निवडून आल्यानंतर गेल्या पाच वर्षापासून रस्ते, वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण, एसआरपीएफ सेंटर, अध्यात्मिक विकास अशा प्रत्येक क्षेत्रात भरीव काम केले आणि याच कामाच्या बळावर ते या निवडणुकीला सामोरे जात आहेत.
गेल्या काही दिवसांपासून रोहित पवार यांची वाटचाल ही केवळ कर्जत जामखेड पुरती मर्यादित नसून राज्याचं भावी नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. त्यांच्यावर राज्याची धुरा असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने त्यांची स्टार प्रचारक म्हणून नेमणूक झाल्याने त्यांचे राज्यभर प्रचार दौरे सुरु आहेत. त्यांनी यापुर्वी आवाहन केल्याप्रमाणे कर्जत जामखेड मतदारसंघाच्या प्रचाराची जबाबदारी स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विशेषतः ज्या नागरिकांबरोबर त्यांचा थेड कनेक्ट आहेत त्या नागरिकांनीच खांद्यावर घेतल्याचं दिसून येत आहे.
त्यांच्या सभांना आणि त्यांना मिळत असलेला उत्फुर्त प्रतिसाद बघितला तर त्यांचा विजय हा केवळ औपचारिकता असून मंगळवारी होणाऱ्या सभेला त्यांनी मताधिक्य मेळावा हे आगळेवेगळे नाव देऊन सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं आहे. या मताधिक्य मेळाव्यासाठी महाविकासआघाडीतील स्टार प्रचारक संजय राऊत हे मंगळवारी जामखेडमध्ये येत आहेत. मंगळवारी सकाळी १० वाजता जामखेड तहसील कार्यालय चौक, जामखेड येथे हा मताधिक्य मेळावा होत असून संजय राऊत काय बोलतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
चौकट,
आपल्या आगळ्या वेगळ्या शैलीने सभा जिंकणारे अहिल्यानगरचे खा.निलेश लंके यांचीही मंगळवारी सांयकाळी.६ वाजता मिरजगाव, ता.कर्जत याठिकाणी जाहीर सभा होणार आहे. यावेळी महाविकासआघाडीचे सर्व घटकपक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. एकाच दिवशी होणाऱ्या या दोन सभांमुळे कर्जत जामखेडचे राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे.