नगरसेवक मोहन पवार कॊतुकास्पद – आ रोहित पवार
गणेशोत्सव स्पर्धाचे बक्षीस वितरण आ रोहित पवार यांच्या हस्ते संपन्न
जामखेड प्रतिनिधी दि
मातोश्री क्रीडा संकुल व लाल आखाडा तालीमचे संचालक नगरसेवक मोहन पवार हे शहरात विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करत असल्याने ते नेहमीच चर्चेत असतात मोहन पवार यांनी माझ्या वाढदिवसाचे औचित्य साधून गणेशत्सवासह विविध सामाजिक उपक्रमासह विविध स्पर्धेचे आयोजन करतात यावेळी मोहन पवार यांचे कौतुक करत त्याचे हे काम नक्कीच कॊतुकास्पद असल्याचे प्रतिपादन आ रोहित पवार यांनी केले
माजी नगरसेवक मोहन पवार,मातोश्री क्रीडा संकुल व लाल आखाडा यांच्या संयुक्त विद्यमानाने आ.रोहित पवार यांचा अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त गेल्या दोन वर्षपासून गणेशोत्सव सजावट,सामाजिक कार्य यावर आधारित स्पर्धाचे आयोजन करण्यात होते,यामध्ये शहरातील जवळपास सर्वच मंडळांनी सहभाग घेतला होता यावर्षी घेण्यात आलेल्या स्पर्धेत जनविकास महिला मंडळाने प्रथम क्रमांकाचे ११ हजाराचे बक्षीस पटकवले असून कोर्ट रोड वरील संघर्ष मित्र मंडळाने द्वितीय क्रमांक,तर युवा शक्ती मंडळाने देण्यात आले
शहरातील राज लॉन्स येथे झालेल्या कार्यक्रमात आ रोहित पवार,नगरसेवक मोहन पवार,जेष्ठ नेते मधुकर राळेभात राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे,च्या हस्ते मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी पै लहु पवार,पै सुरज पवार.उमेश माळवदकर,पत्रकार ओंकार दळवी चेतन राळेभात संजय फुटाणे विशाल लोळगे. दिपक तुपेरे.जितेंद्र आढाव ,संतोष घोलप.सामाजिक कार्यकर्ता मीरा तंटक या मान्यवरांसह राजकीय सामाजिक, क्रीडा, शैक्षणिक व कुस्ती क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते