*विकासाच्या बळावर आमदार रोहित पवार यांची विजयाची केवळ औपचारिकता बाकी-खा निलेश लंके*

कर्जत जामखेड २८ –

विधानसभा निवडणुकीमध्ये कर्जत-जामखेड मतदारसंघातील सुज्ञ नागरिक फक्त रोहित पवार यांना मतदान करणार नाहीत, तर राज्याच्या भावी नेतृत्वाला मतदान करणार आहेत, असे प्रतिपादन अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांनी कालच्या सभेत केले.आमदार रोहित पवार यांनी दमदार शक्तीप्रदर्शन करत स्वाभिमानी कर्जत-जामखेडकरांच्या साक्षीने काल उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मतदारसंघातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांचे समर्थन केले आणि मतदारसंघाच्या विकासासाठी पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास दाखवला.

गेल्या २५ वर्षात भाजपच्या ताब्यात असलेला कर्जत जामखेड मतदारसंघ रोहित पवार यांनी गेल्या ५ वर्षापूर्वी भाजपच्या ताब्यातून हिसकावून घेतला आणि वर्षानुवर्षाचा विकासाचा अणुशेष भरून काढत मतदारसंघात विकासाची भरारी घेतली आणि याच बळावर आता रोहित पवार यांचा विजय केवळ औपचारिकता असल्याचं दिसत आहे.

आमदार रोहित पवार यांनी मागच्या वेळेस कर्जत जामखेडमध्ये पिण्याची समस्या असताना स्वखर्चातून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला. कोणताही संबंध नसताना रोहित पवार यांनी पाणीपुरवठा केल्यामुळं लोकांनी त्यांच्या उमेदवारीची मागणी केली आणि पक्षानेही त्या मागणीची दाखल घेऊन त्यांना उमेदवारी दिली. उमेदवारी दिल्यानंतर रोहित पवार यांनी मोठ्या मताधिक्याने एका कॅबिनेट मंत्र्याला तब्बल ४५ हजार मतांनी धूळ चारली आणि कर्जत जामखेड मतदारसंघात त्यांनी दणदणीत विजय मिळवला. या दणदणीत विजयानंतर त्यांचा विकासरथ एवढा जोरात धावू लागला की गेल्या ५ वर्षात त्यांनी केलेली कामे बगीतली तर आजची निवडणूक ही रोहित पवार यांच्यासाठी केवळ औपचारिकता असल्याचे दिसत आहे.

आमदार झाल्यानंतर रोहित पवार यांनी कर्जत जामखेड मतदारसंघात कोट्यवधी रुपयांची विकासकामे केली. मग मतदारसंघातून जाणारी राष्ट्रीय महामार्ग, गावागावातील रस्ते, पूल बांधले, अद्ययावत शासकीय इमारती, पंचायत समिती कार्यालये, तलाठी कार्यालये, सर्व सुविधायुक्त तीन उपजिल्हा रुग्णालय, शासकीय विश्रामगृह, SRPF केंद्र, डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांना राहण्याची उत्तम सोय केली.

आमदार रोहित पवार यांनी मतदारसंघाततील शेतकऱ्यांचा अडकलेला पीकविमा मंजूर करून आणला. मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे केली. सिंचनासाठी जास्तीत जास्त पाणी कसे आणता येईल याची काळजी घेतली. कधी नवे एवढा सीएसआर निधी मतदारसंघाच्या विकासासाठी खेचून आणला. जिल्हा परिषदेच्या तब्बल ४०० शाळा स्वखर्चातून डिजिटल केल्या. ज्या बँका अगोदर महिलांना कर्ज देण्यासाठी नकारघंटा देत होत्या.अशी परिस्थिती एकेकाळी होती. त्याच कर्जत जामखेड मतदारसंघात आता बँकांनी महिला बचत गटांना ३४ कोटी रुपये कर्ज दिले आहे आणि विशेष म्हणजे त्या कर्जाची परत फेड करण्याचे प्रमाण हे ९९ टक्के आहे. त्यामुळे महिला बचत गटांच्या माध्यमातून वेळेत कर्ज भरल्या जात असल्यामुळे त्या बचत गटांना सरकारकडून देण्यात येणाऱ्या व्याज सवलतीचाही फायदा होत आहे.


आमदार रोहित पवार यांनी काल जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला आणि यावेळी त्यांचा जोश आणि कर्जत जामखेड मतदारसंघातील वातावरण बघितलं तर आमदार रोहित पवार यांचा हा विजय केवळ औपचारिकताच असल्याचं सर्वसामान्य माणसांचे आणि राजकीय धुरीणांचे म्हणणे आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्ष फुटल्यानंतर आमदार रोहित पवार यांनी पक्ष संघटन वाढीसाठी राज्यभर दौरे केले. आता पुढील 15 दिवसात ते मतदारसंघातच प्रचार करतात की राज्यभर प्रचार करतात याबाबत सर्वसामान्य लोकांमध्ये उत्सुकता आहे. पक्षाचा एक प्रमुख चेहरा म्हणून त्यांचं नाव सध्या पुढे येत आहे , यावरून ते राज्यभर दौरे करतील आणि अशा परिस्थितीत लोकांकडूनच त्यांच्या प्रचाराची धुरा स्वतःच्या खांद्यावर घेतली जात असल्याचं चित्र आता गेल्या दोन महिन्यांपासून पाहायला मिळत आहे.

कर्जत जामखेड मतदारसंघातील ह्या लढतीकडे जरी संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असले तरी या लढतीत आमदार रोहित पवार हे त्यांच्या विजयाचा झेंडा फडकविल्याशिवाय राहणार नाहीत अशीच चर्चा सर्वसामान्य लोकांमध्ये आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *