*जामखेड महावितरण येथे दत्त जयंती उत्साहात साजरी*
*उपकार्यकारी अभियंता कटकधोंड यांच्या हस्ते सप्तनिक पूजा*
जामखेड प्रतिनिधी,
जामखेड येथील महावितरण कार्यालय येथे दत्त जयंती साजरी करण्यात आली. यावेळी उपकार्यकारी अभियंता कटकधोंड यांच्या हस्ते सप्तनिक पूजा करून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
या दत्त मंदिराची स्थापना सन.1976 साली त्यावेळी स.अभियंता श्री.पांडे साहेब कि जे कार्य.अभियंता म्हणून मुंबई कार्यालयातून सेवा निवृत्त झाले त्यांचे प्रेरणेतून श्री.दत्त मूर्तीचे प्राण प्रतिष्ठा झाली व ते आजही दत्त जयंती उत्सवा करिता आमचे सहकारी प्र.यंत्र चालक श्री.गोलांडे साहेब यांचे मार्फत आजही 501 /- रु वर्गणी देतात.
आज दत्त जयंतीच्या निमित्ताने सर्वांच्या सहकार्याने 48 वा दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला.त्या निनित्ताने 201 किलो चा महाप्रसाद भाविकांसाठी तयार करत करण्यात आलेला होता
यावेळी सालाबाद प्रमाणे यावेळी
शशिकांत राऊत
वरद सुपर मार्केट
वैभव किराणा स्टोअर
किसन पेचे
बबलू पवार
राजू फिटर
सुरेश पवार
फुटाणे
शंकर डाडर यांच्या सहकार्यातून अन्नदान झाले.
यावेळी श्री.कटकधोंड साहेब उपकार्यकारी अभियंता जामखेड उपविभाग
श्री.राठोड साहेब सहाय्यक अभियंता जामखेड शहर
श्री. उपाध्ये साहेब सहाय्यक अभियंता अरणगाव कक्ष
श्री.खांडेकर साहेब सहाय्यक अभियंता खर्डा कक्ष
श्रीमती चव्हाण मॅडम कनिष्ठ अभियंता
श्री. कदम साहेब सहाय्यक लेखा
श्री.केदार साहेब उच्चस्तर लिपिक
जामखेड उपविभागातील महावितरण चे सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी फाळके साहेब चोरगे साहेब
कापसे साहेब
विक्रांत निकाळजे
परमेश्वर रणदिवे यांनी परिश्रम घेतले.