“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” या योजनेचा महिलांनी लाभ घ्यावा – सभापती शरद कार्ले.
आ.राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” हि योजना तालुक्यात प्रभावीपणे राबविणार – सभापती शरद कार्ले.
जामखेड प्रतिनिधी,
महाराष्ट्राच्या युती शासनाने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली असून यामुळे समाजातील पात्र अश्या २१ ते ६० वर्षे वयाच्या महिलांना दरमहा १५०० रुपये मिळणार असून यासाठी शासन दरवर्षी ४६ ०००कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार आहे.
तरी महिलांनी या योजनेचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन जामखेड बाजार समितीचे सभापती पै. शरद कार्ले यांनी केले आहे.
आ.राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” हि योजना तालुक्यात प्रभावीपणे राबविणार असल्याचे सभापती शरद कार्ले यांनी केले आहे.
सरकारच्या माध्यमातून युवा, शेतकरी,दुर्बल महिला,गरीब महिला अशा विविध घटकांना न्याय देण्याचा काम या होत आहे.त्यामुळे महायुती सरकारचे आभार व्यक्त करत नान्नज येथे पेढे वाटून जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी भारतीय जनता पार्टी जिल्हा सरचिटणीस व मनीषा मोहोळकर, प्रतिभा हजारे, दर्शना साळवे, सुरेखा कोळपकर, मनीषा हजारे, अनिता कुलकर्णी, सारिका भोसले, सुरेखा साठे, मनीषा साळवे, नंदा कोरडे व बचत गटातील व नान्नज गावातील मोठ्या संख्येने उपस्थित होत्या .