फक्राबाद येथे एकाचा चाकूने व काठीने केला खून

फक्राबाद येथे एकाचा चाकूने व काठीने केला खून

एकाचा चाकूने काठीने मारहाण करत खुन,

एका आरोपीस अटक,जामखेड तालुक्यातील फक्राबाद येथील घटना..

जामखेड प्रतिनिधी
भावाने पळवून नेलेली मुलगी तिच्या आईला का सांगितले म्हणून गुरूवार दि. १२ रोजी शिवीगाळ करत तुम्हाला सोडणार नाही अशी धमकी दिली होती. यानंतर वाद मिटल्याने आम्ही तक्रार दिली नव्हती पण आज शुक्रवार दि. १३ रोजी तुकाराम सुर्यभान काळे वय ५० रा. फक्राबाद ता. जामखेड यांना काठी व चाकूने मारहाण करत खुन करण्यात आला आहे. यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.



पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी राहुल तुकाराम काळे वय 25 वर्षे धंदा – मजूरी रा. फक्राबाद ता. जामखेड जि. अहिल्यानगर
यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की फक्राबाद गावचे शिवारातील झोपरपट्टी येथे आरोपी 1) सागर एकनाथ काळे 2) वैभव एकनाथ काळे 3) तुळसाबाई एकनाथ काळे सर्व रा. फक्राबाद ता. जामखेड जि.अहिल्यानगर यांनी तुम्ही कमल बाळु पिंपळे हिची मुलगी आमचा भाऊ ज्ञानेश्वर एकनाथ काळे याने पळवुन नेल्याचे तुम्ही कमल पिंपळे हिस का सांगीतले ? या कारणावरुन चाकुने व काठीने मारहान करुन माझे वडील यांचे गंभीर दुखापत करुन त्यांचा खुन केला आहे. जामखेड पोलीसांनी वैभव एकनाथ काळे यास अटक केली आहे.

फिर्यादी राहुल तुकाराम काळे वय 25 वर्षे धंदा – मजूरी रा.फक्राबाद येथे मी मुले सोन्या, मोन्या, मुलगी सोनाली, आई कल्पना, भाऊ दिगांबर व सुनील, वहीनी पुनम व रेश्मा, तसेच मयत वडील तुकाराम सुर्यभान काळे वय 50 वर्षे रा. फक्राबाद ता. जामखेड जि. अहिल्यानगर असे एकत्र राहतो.
मजुरी करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो.

काल दिनांक 12/02/2026 रोजी सागर एकनाथ काळे व वैभव एकनाथ काळे व तुळसाबाई एकनाथ काळे हे आमचे घरी आले आणी आम्हाला म्हणाले की, तुम्ही कमल बाळू पिंपळे हिची मुलगी आमचा भाऊ ज्ञानेश्वर एकनाथ काळे याने पळवून नेल्याचे तुम्ही कमल पिंपळे हिस का सांगीतले ? असे म्हशिवीगाळ केली होती आणी तुम्हाला सोडणार नाही अशी धमकी दिली होती. त्यानंतर आमचा वाद मिटल्याने आम्ही तक्रार दिली नव्हती.

आज दि. 13/02/2026 रोजी सकाळी 10.30 वाजण्याचे सुमारास मी माझे फक्राबाद गावचे शिवारातील घरी असताना बबन लोंढे याने आमचे घरी येवुन सांगीतले की, तुझे वडील तुकाराम सुर्यभान काळे रा.फक्राबाद ता.जामखेड जि. अहिल्यानगर यास 1) सागर एकनाथ काळे 2) वैभव एकनाथ काळे 3) तुळसाबाई एकनाथ काळे सर्व रा.फक्राबाद ता. जामखेड जि. अहिल्यानगर हे झोपडपट्टी येथे मारत आहेत अशी माहीती सांगीतल्याने मी, व भाऊ दिगांबर तुकाराम काळे, असे आम्ही झोपरपट्टीकडे पळत गेलो असता तेथे माझे वडीलांना 1) सागर एकनाथ काळेहा चाकुने माराहण करीत होता तसेच 2) वैभव एकनाथ काळे हा चाकुने वडीलांना मारहाण करीत होता तसेच 3)तुळसाबाई एकनाथ काळे हि काठीने मारहाण करीत होती.

आम्ही पळत येताना पाहुन ते त्यांचे गाडीवर बसुन पळुन गेले. माझे वडीलांचे शरीरावर चाकुने डोक्यात व खांद्यावर वार झाल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली होती. जास्त रक्त येत होते. व बेशुध्द झाले होते त्यानंतर आम्ही आमचे वडील तुकाराम काळे यांना तात्काळ खाजगी अँम्बुलन्सने सरकारी दवाखाना जामखेड येथे घेवुन आलो. तेथे डॉक्टरांनी माझे वडील तुकाराम सुर्यभान काळे रा. फक्राबाद ता.जामखेड जि. अहिल्यानगर यांना तपासले असता ते उपचारापुर्वीच मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगीतले आहे.

यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. जामखेड पोलीसांनी गुन्हा नंबर 81/26
कलम 103(1) 352, 351 तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यातील एक आरोपी वैभव एकनाथ काळे यास जामखेड पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. वरील घटनेचा तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी हे करत आहेत.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page