भावी नगरसेवकांनो लागा तयारीला ,अखेर जामखेड नगरपरिषदेच्या नगरसेवक पदाचे आरक्षण जाहीर…
जामखेड प्रतिनिधी
गेल्या पाच वर्षांपासुन रखडलेल्या स्थानिका स्वराज्य संस्थांच्या निवडणुक प्रक्रियेला वेग आला आहे.
जामखेड नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी अंतीम प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर बुधवारी प्रभागनिहाय अरक्षण सोडत काढण्यात आली.
पिठासन अधिकारी तथा कर्जतचे प्रांताधिकारी नितीन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही आरक्षण सोडत काढण्यात आली. यावेळी मुख्याधिकारी अजय साळवे हे देखील उपस्थित होते.
आनेक वर्षापासून नगरपरिषदेच्या निवडणूका रखडल्या होत्या. अखेर आज बुधवार दि ८ रोजी सकाळी अकरा वाजता जामखेड पंचायत समितीच्या कार्यालयामध्ये जामखेड नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुक २०२५ च्या आरक्षण सोडत कार्यक्रम संपन्न झाला.
प्राथमिक शाळेचे विद्यार्थी श्रेयश सागर व्यवहारे, साई प्रमोद टेकाळे व मोक्षदा मयुर पुजारी या तीन विद्यार्थांच्या हाताने नंबर नुसार प्रभागाची सोडत काढण्यात आली. यावेळी जामखेड शहरातील सर्व पक्षसंघटनांचे पदाधिकारी, इच्छुक उमेदवार व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खालील प्रमाणे आहे प्रभागनिहाय अरक्षण जाहीर
प्रभाग क्रमांक १ मध्ये जागा क्रमांक (अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला व जागा क्रमांक (ब) मध्ये, सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक २ मध्ये जागा क्रमांक (अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग व जागा क्रमांक (ब) मध्ये सर्वसाधारण महिला.
प्रभाग क्रमांक ३ मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग व जागा क्रमांक (ब) मध्ये सर्वसाधारण महिला.
प्रभाग क्रमांक ४ मध्ये जागा क्रमांक (अ) अनुसूचित जाती व जागा क्रमांक (ब) मध्ये सर्वसाधारण महिला.
प्रभाग क्रमांक ५ मध्ये जागा क्रमांक (अ) अनु जमाती व जागा क्रमांक (ब) मध्ये सर्वसाधारण महिला.
प्रभाग क्रमांक ६ मध्ये जागा क्रमांक (अ) अनुसूचित जाती महिला व जागा क्रमांक (ब) मध्ये सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ७ मध्ये जागा क्रमांक (अ) सर्वसाधारण महिला व जागा क्रमांक (ब) मध्ये सर्वसाधारण.
प्रभाग क्रमांक ८ मध्ये जागा क्रमांक (अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला व जागा क्रमांक (ब) मध्ये सर्वसाधारण.
प्रभाग क्रमांक ९ मध्ये जागा क्रमांक (अ) सर्वसाधारण महिला व जागा क्रमांक (ब) मध्ये सर्वसाधारण.
प्रभाग क्रमांक १० मध्ये जागा क्रमांक (अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला व जागा क्रमांक (ब) मध्ये सर्वसाधारण.
प्रभाग क्रमांक ११ मध्ये जागा क्रमांक (अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग व जागा क्रमांक (ब) मध्ये सर्वसाधारण महिला.
प्रभाग क्रमांक १२ मध्ये जागा क्रमांक (अ) अनुसूचित जाती महिला व जागा क्रमांक (ब) मध्ये सर्वसाधारण.यानुसार जामखेड नगरपरिषदेच्या नगरसेवक पदाचे आरक्षण काढण्यात आले असून उद्या दि. ९ ऑक्टोबर रोजी नगरपरिषदचे मुख्याधिकारी अजय साळवे हे आरक्षण महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात जाहीर करण्यात येणार आहे. यावर हरकतींसाठी दि. ९ ऑक्टोबर पासून १४ ऑक्टोबर २०२५ पर्यंत मुदत असून हरकती दाखल करण्याची मुदत असून हरकती असल्यास नगरपरिषद कार्यालयात विहीत नमुन्यात हरकती दाखल करता येणार आहेत. या सोडती नुसार प्रत्येक प्रभात (अ) तक्त्यातील एक व (ब) तक्त्यातील एक समान क्रमांकांचे उमेदवार सोबत उमेदवार असणार आहेत.