जोरदार पावसामुळे नागेश्वर मंदिराजवळील लोखंडी पुल गेला वाहुन
जामखेड तालुक्याला पावसाने झोडपून काढले पन्नास वर्षांतला सर्वात मोठा पाऊस.
जामखेड प्रतिनिधी,
मागील काही दिवसांपासून राज्यासह जामखेड तालुक्यात मोठ्याप्रमाणात पाऊस पडत आहे काल रात्रीतर पावसाचा कहरच पाहावयास मिळाला या तुफान पावसामुळे जामखेडच्या नागेश्वर मंदिर परिसरातील विकासकामे वाहुन गेली आहेत.

शहरातील धाकट्या नदीकाठी नागेश्वर मंदिराकडे जाण्यासाठी लोखंडी पुल तयार केला होता तसेच मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात विकासकामे करण्यात आलेली आहेत यामध्ये नदीकाठी दोन्ही बाजुंनी सिमेंटचे रस्ते या लगद दगडी पिचिंग तसेच नदीपात्रात उतरण्यासाठी दगडी घाट बांधण्यात आला आहे

हे विकासकामे करताना संबंधित अधिकारी व ठेकेदार यांनी नदीपात्राचा प्रवाह बदलला व पात्राची रूंदी कमी केली त्यामुळेच लोखंडी पुल व नदीकाठाचे विकासकामे वाहुन गेली आहेत त्यामुळे या विकासकामांची चौकशी करून संबंधितांनकडुन नुकसानभरपाई करून घ्यावी आशी मागणी नागरिकांनी केली आहे

तसेच तालुक्यात आनेक ठिकाणी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर शेतीपिकांचेही नुकसान झाले आहे हातातोंडाशी आलेली सोयाबीन उडीद तुर पाण्यात पोहत आहेत तालुक्यात पावसाळी कांद्याचीही मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली होती परंतु या कोळसधार पावसामुळे पुर्ण कांदा वाहुन गेला आहे शेतजमिनींना तळ्याचे स्वरूप आले आहे त्यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे शासनाने ताबडतोब पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी आशी मागणी प्रशासनाकडे केली जात आहे

नुकतच विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे व कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी नुकसानग्रस्त भागाची पहाणी करून तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले आहेत
![]()