नागपंचमी – नागेश्वर यात्रेसाठी प्रशासन सज्ज – शांतता कमिटीची बैठक संपन्न 

नागपंचमी – नागेश्वर यात्रेसाठी प्रशासन सज्ज – शांतता कमिटीची बैठक संपन्न

जामखेड प्रतिनिधी,

श्री नागेश्वर यात्रा व नागपंचमी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जामखेड तहसील कार्यालयात आज दुपारी १२.१० वाजता शांतता कमिटी बैठक पार पडली.या बैठकीच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार गणेश माळी तर जामखेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजय साळवे, पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, महावितरण चे प्रदीप कटकधोंड, सहाय्यक अभियंता प्रशांत शिंदे,उच्चस्तर लिपिक गणेश केदार यांच्यासह विविध प्रशासकीय अधिकारी तसेच यावेळी शांतता कमिटीच्या बैठकीसाठी जेष्ठ नेते मधुकर राळेभात, माजी सभापती डॉ.भगवान मुरूमकर,प्राचार्य विकी घायतडक,बाजार समितीचे सभापती पै.शरद कार्ले, राष्ट्रवादीच्या युवती प्रदेशाध्यक्षा संध्या सोनवणे,प्रदीप टापरे,अजय काशिद, नय्युमभाई सुभेदार, आतिश पारवे,बाजार समितीचे सचिव वाहेद सय्यद,संचालक राहुल बेदमुथ्था,मंगेश आजबे, उद्योजक आकाश बाफना,अवधूत पवार, विनायक राऊत,राजेश मोरे,नगरसेवक मोहन पवार, दिगांबर चव्हाण,अमित जाधव ,पवन राळेभात,शामीर सय्यद, पांडुरंग भोसले,कुंडल राळेभात,संजय कोठारी ,विकी सदाफुले,उमर कुरेशी,संपत राळेभात,तात्याराम पोकळे,जमीर सय्यद,वसीम सय्यद,प्रशांत राळेभात,प्रविण उगले,अभिजीत राळेभात,भरत जगदाळे,सुनील जगताप,गणेश माने, संजय डोके,बाबा चंदन, विशाल अब्दुले,सचिन शिंदे,ऋषिकेश खरात,किशोर कांबळे आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीत उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून विविध महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. आनंद मेळा एकाच ठिकाणी भरवून रस्ते मोकळे ठेवण्यास सांगण्यात आले असून, त्याठिकाणी अग्निशमन वाहन, ॲम्बुलन्स व पाणी तसेच स्वच्छतागृहाची व्यवस्था अनिवार्य करण्यात आली आहे. सर्व आयोजकांनी आवश्यक ती परवानगी घेणे, लाईटसाठी महावितरण कडून अधिकृत कनेक्शन घेणे आणि नगरपरिषदेची ना हरकत घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.

नर्तिका डाव ज्या ठिकाणी आहेत त्या मंडळाच्या अध्यक्षांनी जामखेड नगर परिषद यांची ना हरकत परवानगी घेऊन स्वयंसेवक नियुक्त करावे तसेच महावितरणची रितसर परवानगी घ्यावी.नागपंचमी दरम्यान स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेरे, स्वयंसेवक नेमणूक, लाईट अखंडित ठेवणे, पालखी मिरवणूक मार्ग मोकळा ठेवणे, मांस विक्रेत्यांनी दुकाने बंद ठेवणे, स्ट्रीट व सौर लाईटची उभारणी तसेच पोलीस पेट्रोलिंग वाढवण्याबाबत ठोस चर्चा झाली.

याशिवाय, पाळणे दर निश्चित करणे, कमानीसाठी परवानगी घेणे, गुन्हेगारी प्रवृत्तीवर कारवाई करणे, कुस्ती आखाड्याजवळ पार्किंगची व्यवस्था करणे, सिव्हिल ड्रेसमधील पोलिसांची नेमणूक वाढवणे, आनंद मेळा ठिकाणी पोलीस चौकी व अलाउन्स सिस्टीम बसवणे, ग्रामस्थांच्या सूचनांचा विचार करून आयोजन करणे आणि अडचणी सोडवण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्याचे ठरले.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page