*नाहुली संस्थेच्या पहिल्याच निवडणुकीत विधान परिषद सभापती प्रा.राम शिंदे साहेब यांचेकडून सत्तेचा गैरवापर – कल्याण जाधव*
जामखेड तालुक्यातील नाहुली विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या स्थापनेनंतर झालेल्या पहिल्या निवडणुकीत विधान परिषद सभापती प्रा.राम शिंदे साहेब यांनी हस्तक्षेप करून गैरमार्गाने विजय मिळविला असल्याचे मत व्यक्त करून या निकालाविरोधात न्यायालयीन लढा लढणार असल्याचे परखड मत पॅनलप्रमुख कल्याण जाधव यांनी व्यक्त केले आहे.
नाहुली विका संस्थेच्या झालेल्या निवडणुकीत कल्याण जाधव यांच्या पॅनल मधून अंगद नामदेव बहिर, छाया बाळू जाधव, वर्षा बाळासाहेब जाधव, पांडुरंग बाबू जाधव, सोमनाथ पंढरीनाथ बहिर, संदीपान भागवत बहिर, बाळू महादेव बहिर, नवनाथ आत्माराम काळदाते, गौतम भगवान बहिर यांनी सर्व साधारण कर्जदार मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केले होते. परंतु प्रा.राम शिंदे यांच्या कृपार्शिवादाने निवडणूक अधिकारी यांनी वर्षा बाळासाहेब जाधव व छाया बाळू जाधव यांचे उमेदवारी अर्ज जाणीवपूर्वक महिला प्रतिनिधी मतदार संघातून मंजूर केले आहेत. तर महिला मतदार संघातून वंदना कल्याण जाधव व राजूबाई बाबासाहेब जाधव याचे अर्ज असताना त्यांचे अर्ज मात्र नामंजूर केले आहेत.
नाहुली संस्था हि फक्त नोंदणीकृत संस्था असून त्या संस्थेस अद्यापही जिल्हा सहकारी बँकेकडून कर्जपुरवठा झालेला नसताना कोणत्या आधारावर सदरील उमेदवार कर्जदार मतदार संघातून बिनविरोध निवडून आले आहेत असा सवाल पॅनलप्रमुख कल्याण जाधव यांनी उपस्थित केला असून हि संस्था जिल्हा सहकारी बँकेची आजतागायत सभासदच नसल्याने कर्जत – जामखेडचे लोकप्रिय आ.रोहित दादा पवार व जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात यांना कोणत्या प्रकारचा धक्का बसला.
वास्तविक पाहता १२७ सभासद असलेल्या नाहुली संस्थेच्या पहिल्या निवडणुकीतच विरोधी पॅनल उभा राहतो यावरून संस्थेचे मुख्यप्रवर्तक श्री.घुमरे यांच्या विचारांची दिवाळखोरी लक्षात येते. स्वतः पुढाकार घेवून स्थापन केलेली संस्था बिनविरोध न काढता त्या संस्थेची निवडणूक होत असेल तर त्यांच्यावर सभासदांची विश्वासाहर्ता कितपत आहे ही खूप मोठी शोकांतिका आहे.