नाशिक मध्ये राज्यस्तरीय गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार हा अभिमानाचा क्षण : मोहनलाल लोढा

नाशिक मध्ये राज्यस्तरीय गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार हा अभिमानाचा क्षण : मोहनलाल लोढा

जामखेड( प्रतिनिधी)
श्री ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स महाराष्ट्र प्रांत चतुर्थ झोन आयोजित राज्यस्तरीय गुणवंत विद्यार्थी सत्कार आणि आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभ रविवार दिनांक १० ऑगस्ट २०२५ रोजी नाशिक येथील धनदाई बँक्वेट हॉल येथे संपन्न झाला.


यावेळी बोलताना कार्यक्रमाचे मुख्य आयोजक व महाराष्ट्र प्रांत चतुर्थ झोनचे अध्यक्ष मोहनलाल लोढा यांनी संपूर्ण राज्यातून आलेल्या अतिथी व गुणवंतांचे स्वागत केले व संपूर्ण नाशिक साठी हा अभिमानाचा क्षण असल्याचे नमूद केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष ब्रिजलाल कटारिया यांनी
यावेळी बोलताना कार्यक्रमाचे अध्यक्ष ब्रिजलाल कटारिया यांनी मुलांच्या कलागुणांना वाव दिला तर मुलांची बौद्धिक क्षमता वाढते मुलं शिक्षणात पुढे जातात ज्या मुलांना पुरस्कार मिळाले त्यांचे खरोखर अभिनंदन केले पाहिजे आणि ज्यांना नाही मिळाले त्यांनी पुढच्या वेळी आपल्याला कसा पुरस्कार मिळेल हे पाहून अभ्यास करावे असे नमूद केले.
विहारधाम योजनेचे राष्ट्रीय अध्यक्ष कांतीलाल चोपडा यांनी
मोहनलाल लोढा हे नेहमीच सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असतात व त्यांनी अतिशय भव्य अशा सत्कार समारंभाचा आयोजन केले त्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
या कार्यक्रमात संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून आलेल्या दहावी-बारावी व उच्चशिक्षित अशा १५१ गुणवंत विद्यार्थ्यांचा, जैन प्रतिक्रमण या कठीण सूत्र कंठस्थ करणाऱ्या २२लहान बालकांचा व २१ आदर्श शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास विजय टाटिया, सीए अक्षय राका, संजय बाफना, नंदलाल शिंगवी, विनोद कुचेरिया आशिष भन्साळी यांनी विशेष सहयोग दिला मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी विशेष अतिथी मंगलचंद साखला, शांतीलाल चोरडिया, सुमेरकुमार काळे, संजय कोठारी, महावीर भन्साळी ,नंदकिशोर साखला ,ललित मोदी, सुनील चोपडा, जे.सी. भंडारी, अजित सुराणा, संतोष मंडलेचा ,डॉ.किरण धाडीवाल, दिलीप बोरा ,संजय बाफना, राजेंद्र टाटिया, पोपटलाल लोढा,अनिल लोढा, अनिल नहार उपस्थित होते.
राष्ट्रीय अध्यक्ष आत्मज्ञान योजना शशिकुमार (पिंटूभाऊ) कर्नावट, महामंत्री शांतीकुमार दूगड, वरिष्ठ उपाध्यक्ष पद्मम राका, कोषाध्यक्ष हेमराज खाबिया, उपाध्यक्ष लखमीचंद पारख, मोतीलाल चोरडिया , जिल्हाध्यक्ष नंदलाल शिंगवी, चंपालाल लासुर स्टेशन,प्रकल्प संयोजक सी ए लोकेश पारख, राजेंद्र कुमट, बालचंद चोरडिया, भूषण लोढा यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकल्प संयोजक प्रा. सीए. लोकेश पारख यांनी केले व आभार महामंत्री शांतीलाल दुगड यांनी मानले
याप्रसंगी प्रांतीय मंत्री महेश बाफना, गौतम संचेती ,प्रेमराज भंडारी, अनिल शिवसरा ,सचिन भंडारी ,प्रवीण मुनोत, डॉक्टर नंदलाल बोथरा, मनोज भटेवरा ,गणेश भंडारी ,डॉक्टर घेवरचंद धोका ,संजय सुराणा ,भूषण लोढा, शैलेश बाफना, राजेंद्र कुमट सचिन कटारिया बालचंद छाजेड प्रीतम बोरा त्यांना सुख झांबड चंद्रकांत लोढा, श्याम चोरडिया विनोद बेदमुथा राजेंद्र चोपडा ,हरीश लोढा ,सुभाष नहार चंपालाल लोढा मनोज लोढा, मंत्री रमणलाल आली झाड, संदीप गांग , दिनेश राका अक्षय राका,निलेश भंडारी उपस्थित होत्या
यावेळी बोलताना कांतीलाल चोपडा म्हणाले आम्ही आणि मोहनलालजी लोढा मिळून प्रत्येक कार्यक्रम चांगल्या प्रकारे करण्याचे काम करत आहोत आम्हाला बऱ्याच दानशुरांचे कार्यक्रमास सहकार्य लावत आहे महाराष्ट्रातून या कार्यक्रमास प्रमुख अतिथी आले आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली याबद्दल मी त्यांचा आभारी आहे तसेच या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थी सत्कार ग्रॅज्युएट उच्चशिक्षित सीए डॉक्टर वकील इंजिनियर यांचे पण सत्कार करण्यात आले तसेच या मुलांना घडवणाऱ्या शिक्षकांचे पण आम्ही पुरस्कार देऊन त्यांना गौरवले आहे
यावेळी बोलताना शशिकांत उर्फ पिंटू भाऊ कर्नावट म्हणाले वयानुसार लोढा जी खूप जोमाने काम करत आहेत काल रात्री दोन वाजेपर्यंत ते कार्यक्रमाचे नियोजन करत होते आणि कार्यक्रमाचे खूप चांगल्या प्रकारे त्यांनी काम केले आहे दीडशे गुणवंत विद्यार्थ्यांना ट्रॉफी आणि एक रजिस्टर देण्यात आले आहे.
यावेळी बोलताना जैन कॉन्फरन्स चे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी म्हणाले कांतीभाऊं लोढा यांनी ठेवलेल्या प्रत्येक कार्यक्रमास आम्ही हजर राहतो खरोखर चतुर्थ झोन मध्ये आत्तापर्यंत असे कधीच कार्यक्रम झाले नाहीत आजच्या कार्यक्रमांमध्ये बारा वर्षाच्या आतील मुलांनी प्रतिक्रमण पाठ केले आहे त्यांना गौरवण्यात आले आणि त्यांना चांदीचे १० ग्राम नाणे देण्यात आले.
यावेळी उच्चस्तरीय सर्वांचा सत्कार करून त्यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले मोहनलाल लोढा चे खूप खूप आभार
राज्यस्तरीय जैन संप्रदायाच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सन्मान दहावी बारावी सीए डॉक्टर इंजिनियर वकील आर्किटेक, सी एस सी एम ए एम बी ए एम पी एस सी यु पी एस सी आदी विद्यार्थ्यांचा सत्कार झाला.
राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार राजेश मुनोत अध्यक्ष अहिंसा एज्युकेशन इन्स्टिट्यूट दोंडाईचा धुळे,
तसेच बारा वर्षाच्या आतील जैन मुलांना मुलींना प्रतिक्रमण तोंडी पाठ झाल्यामुळे त्यांना संजय बाफना यांच्यामार्फत दहा ग्रॅमच्या चांदीचे नाणे देण्यात आले
अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी दिली

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page