पीडित अत्याचारग्रस्त एकल महिलांना हक्काचा आधार आईचे घर- मा.जयंती ताई फडके (पुणे)

पीडित अत्याचारग्रस्त एकल महिलांना हक्काचा आधार आईचे घर- मा.जयंती ताई फडके (पुणे)

जामखेड प्रतिनिधी,

टोल ग्रुप पुणे व ग्रामीण विकास केंद्र जामखेड यांच्या सहकार्याने निवारा बालगृह मोहा फाटा (समता भूमी) ता.जामखेड जि.अहमदनगर येथे आईचे घर प्रकल्पा अंतर्गतपीडित,निराधार,अनाथ,अत्याचारग्रस्त,गरजू,एकल महिलांसाठी कौशल्य आधारित मोफत शिलाई मशीन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक मा.जयंती ताई फडके (टोल ग्रुप पुणे) तसेच मा.श्रीम.धनलक्ष्मी ताई हजारे (अध्यक्ष ज्योती क्रांती प्रतिष्ठान जवळा) मा.श्रीम.चंद्रकला औटी (मुख्य समन्वयक सुवर्णज्योत ज्योती क्रांती सावित्रीबाई फुले बालसंगोपन पारनेर) मा.श्रीम.मायाताई आव्हाड (अध्यक्षा महिला बचत गट फेडरेशन) मा.श्रीम.लताताई अनिल थोरात (सामाजिक कार्यकर्त्या) मा. श्रीम.उमाताई जाधव (ग्रामीण विकास केंद्र सचिव) मा.क्लिफर्ड अल्वारेस (टोल ग्रुप पुणे) कविता मुदलीयार, तनुजा अंबुलकर,जयदीप शेनगुप्ता,राहुल सलूजा आदी मान्यवर उपस्थित होते.

भारतीय संविधान प्रस्ताविकेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व प्रमुख पाहुण्यांचे ग्रामीण विकास केंद्र संचलित आईचे घर या प्रकल्पा अंतर्गत गुलाब गुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

कौशल्य आधारित मोफत शिलाई मशीन प्रशिक्षणासाठी मोहा,जवळा,घोडेगाव,पाडळी,झिक्री,धनेगाव,हापटेवाडी,जामखेड, अश्या गरजू 130 महिलांचा समावेश होता.
यावेळी मा.जयंती ताई फडके (टोल ग्रुप पुणे) म्हणाल्या की पीडित निराधार अनाथ अत्याचारग्रस्त गरजू एकल महिलांना आधार देणे त्यांचा आत्मविश्वास वाढून त्यांना स्वतःच्या पायावरती उभा करणे स्वावलंबी बनवणे हे आमचे स्वप्न आहे.

आज काल महिलांचे खूप मोठ्या प्रमाणत हाल होतात त्यांचे शोषण होते त्यांच्यावर अत्याचार केला जातो दबावा पोटी महिला बळी पडतात त्यांचा आवाज दाबला जातो अश्या अत्याचारग्रस्त एकल महिला उभ्या करून त्याना बाहेर पाडणे महत्वाचे आहे.हेच काम टोल ग्रुप पुणे व ग्रामीण विकास केंद्र जामखेड गेल्या तीन वर्षांपासून 60 गावामध्ये काम करते .पुढील येणाऱ्या काळात टोल ग्रुप पुणे व ग्रामीण विकास केंद्र जामखेड पीडित निराधार अनाथ अत्याचारग्रस्त गरजू एकल महिलांच्या पाठीशी खंबीर पणे उभा आहे.कोणत्याही महिलांनी घाबरून व खचून जाऊ नये आईचे घर प्रकल्पात येऊन राहणे असे जयंती ताई फडके यांनी आवाहन केले.

तसेच ॲड.डॉ.अरुण आबा जाधव (संस्थापक अध्यक्ष) म्हणाले की गेली 32 वर्षांपासून समाजसेवेचे काम करतो कोणत्याही पीडित निराधार अनाथ अत्याचारग्रस्त महिलांनी अन्यायाला अत्याचाराला खचून न जाता आत्महत्या करायचे नाही घाबरून जायचं नाही तुमचा भाऊ म्हणून तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.
यावेळी मा.बापू ओहोळ (संचालक ग्रामीण विकास केंद्र जामखेड) महादेव बांगर सर,मायाताई आव्हाड,चंद्रकला औटी ,तनुजा अंबुलकर,यांनी मनोगत व्यक्त केले.

प्रस्तावना नंदकुमार गाडे व सूत्रसंचालन संतोष चव्हाण यांनी केले तर आभार तुकाराम शिंदे यांनी मानले.
यावेळी विशाल पवार,सचिन भिंगारदिवे,वैजीनाथ केसकर,तुकाराम पवार,राजू शिंदे, द्वारका पवार, लता सावंत, पल्लवी शेलार, रोहिणी राऊत, सुनिता बनकर, उज्वला मदने,रेश्मा बागवान,ऋषिकेश गायकवाड, नंदकुमार गाडे,शितल पवार,शुभांगी गोहेर,अर्चना भैलुमे,राहुल पवार,शहानुर काळे, दिपाली काळे,नीता इंगळे,गणपत कराळे,सुरेखा चव्हाण,पायल मुळेकर, गौतमी गंगावणे व महिला उपस्थित होत्या.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page