अखेर जामखेड पंचायत समितीचे आरक्षण सोडत जाहीर निवडणुकीचा मार्ग मोकळा…
जामखेड प्रतिनिधी –
जामखेड पंचायत समितीच्या सहा गणांसाठीची आरक्षण सोडत जाहीर झाली.

जामखेड पंचायत समितीसाठी जवळा, अरणगांव, खर्डा, दिघोळ, साकत आणि शिऊर असे सहा पंचायत समिती गण आहेत. या सहा गणांसाठीची आरक्षण सोडत आज १३ ऑक्टोबर रोजी जामखेड तहसील कार्यालयात पार पडली.

पंचायत समिती आरक्षण खालील प्रमाणे
जवळा : अनुसूचित जाती महिला
अरणगाव : ओबीसी महिला
दिघोळ – ओपन महिला
साकत – सर्वसाधारण
खर्डा – सर्वसाधारण
शिऊर- सर्वसाधारण

येत्या तीन महिन्यात पंचायत समिती निवडणूकीचा धुराळा रंगणार आहे. पंचायत समितीचे सभापतीपद ओबीसी महिलेसाठी राखीव झाले आहे.
या पदासाठी सर्वाधिक चुरशीची आणि काट्याची टक्कर होताना दिसणार आहे. अरणगाव गणासाठी ओबीसी महिला आरक्षण जाहीर झाल्याने या गणात सर्वाधिक चुरशीची लढत होणार आहे.
![]()
