*पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस सेवा पंधरवाडा म्हणून साजरा करण्यात येणार- तालुका अध्यक्ष बापूराव ढवळे*
जामखेड प्रतिनिधी
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवाडा तालुक्यात प्रभाविपणे राबवण्यात येणार आहे
देशाचे लाडके पंतप्रधान श्री नरेंद्रभाई मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून सेवा परम धर्म या युक्तीप्रमाणे वंचित शोषित घटकांची सेवा करणे विविध समाज उपयोगी शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे अशी माहिती भाजपाचे तालुकाध्यक्ष ग्रामीण मंडल बापूराव ढवळे यांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपने 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीमध्ये सेवा पंधरवाडा साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे या कालावधीत देशभरात अनेक समाज उपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबर रोजी स्वस्त नारी सशक्त परिवार अभियान या उपक्रमाचा उद्देश महिला आणि मुलांसाठी असलेली आरोग्य सेवा अधिक मजबूत करणे असणार आहे हे सर्व समाज उपयोगी कार्यक्रम तालुक्यात प्रभावीपणे राबविण्यात येणार आहेत अशी माहिती बोलताना बापूराव ढवळे यांनी दिली आहे
सेवा सुशासन संघटनात्मक प्रवास या सेवा पंधरवाडा कार्यक्रमाचे आयोजन 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे त्यासाठी जामखेड शहर मंडळाची नियोजन बैठक घेण्यात आली तालुका अध्यक्ष बापूराव ढवळे यांनी मार्गदर्शन केले.
अंततोदय व्यक्तीची सेवा करणे स्वच्छता ही अंगी बाळगावी रक्तदान सारखे उपक्रम विविध आरोग्य शिबिराचे आयोजन अशा कार्यक्रमांची माहिती दिली विशेष म्हणजे शासकीय पातळीवर पण हा कार्यक्रम अशाच सेवाभावी उपक्रमांनी साजरा होणार आहे त्यासाठी भाजप संघटन जोरदार पाठबळ देणार असून त्याबद्दलचे नियोजन दिलीप भालसिंग भाजपा अहिल्यानगर करत असून त्याचीही माहिती या बैठकीत दिली या बैठकीसाठी मंडळ अध्यक्ष जिल्हा कार्यकारणी सदस्य लोकप्रतिनिधी उपस्थित होते
या बैठकीसाठी जामखेडचे प्रभारी चंद्रशेखर खरमरे भाजपा नेते रवी सुरवसे जिल्हा उपाध्यक्ष अजय काशीद माजी सभापती डॉक्टर भगवानराव मुरूमकर प्राध्यापक मधुकर राळेभात जामखेड ग्रामीण मंडळ अध्यक्ष बापुराव ढवळे शहर मंडळाध्यक्ष संजय काका काशीद माजी जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ पाचरणे, जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरद कारले उपसभापती नंदकुमार गोरे प्रवीण चोरडिया संचालक राहुल बेदमुथा हनुमंत गावडे माजी नगराध्यक्ष सोमनाथ राळेभात पोपट राळेभात, सरपंच पांडुरंग उबाळे राहुल चोरगे भाजपा नेत्या लक्ष्मीताई पवार रुकसाना भाभी,वैशाली शिंदे, निशा राम पवार व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.