पुरवठा विभागात ऑनलाईन करणारे कॉन्ट्रॅक्ट बेसवरचे युवा कर्मचारी नागरिकांना करीत आहे अरेरावेची भाषा…

तहसील कार्यालय समोर धरणे आंदोलनाचा करण्याचा दिला इशारा – सामाजिक कार्यकर्ते रमेश (दादा) आजबे

पुरवठा विभागात वयोवृद्ध, ज्येष्ठ नागरिक, महिला पुरवठा विभागात हेलपाटे मारून झाले हैराण !!

जामखेड प्रतिनिधी

जामखेड येथील तहसील कार्यालयात आसलेल्या पुरवठा विभागात अनागोंदी कारभार सुरू आहे. या ठिकाणी महीला व जेष्ठ नागरिकांची कुपन ऑनलाईन ची कामे होत नसल्याने नागरीक वैतागले आहेत. परीणामी नागरीकांची ससेहेलपट न थांबल्यास येणाऱ्या काही दिवसात तहसील कार्यालयासमोर जेष्ठ नागरीकांन समवेत धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा येथील सामाजिक कार्यकर्ते रमेश दादा आजबे यांनी दिला आहे.
जामखेड येथील पुरवठा विभागात वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक महिला या पुरवठा विभागात हेलपाटे मारून झाले हैराण झाले आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून यापुरवठा विभागात नविन रेशन कार्ड ऑनलाइन करणे, विवाहित मुलीचे नाव कमी करणे, नवीन विवाहित सुनांचे नाव समाविष्ट करणे, तसेच मयताचे नाव कमी करणे, धान्य मिळवण्यासाठी कुपन ऑनलाईन करणे यासाठी नागरिक पुरवठा विभागात हेलपाटे मारत आहेत.

यासर्व गोष्टी ऑनलाइन करण्यासाठी दररोज तहसील कार्यालयातील जेष्ठ नागरिक देखील पुरवठा विभागाचे उंबरठे झिजवत आहेत. याठिकाणी पुरवठा विभागात सक्षम अधिकारी नसल्याने पुरवठा विभागाचा बोजवारा उडाला आहे. तसेच याठिकाणी शासनाने टेंडर पद्धतीने नेमणूक केलेल्या ऑनलाईन करणारे युवा कर्मचारी हे देखील नागरिकांना अरेरावेची भाषा वापरत आहेत. ज्येष्ठ नागरिकांना अरे तुरेची भाषा वापरतात आहेत, असं नागरिकांनी बोलताना सांगितले आहे. यासर्व गोष्टींवर मार्ग काढण्यासाठी काल दि 22 रोजी सामाजिक कार्यकर्ते रमेश (दादा) आजबे यांनी आवाज उठवला आहे.

या नागरिकांना घेऊन त्यांनी तहसील कार्यालयासमोर या सर्व प्रश्नांबाबत जाब विचारला या ठिकाणी दिलेले सर्व अर्ज अस्ताव्यस्त पडलेले असून एक वर्षांपूर्वी दिलेले अर्ज त्याचाही अद्याप शोध लागत नाही यामुळे नागरिक त्रस्त झालेले आहेत.या पुरवठा विभागात येणाऱ्या जेष्ठ नागरिक व सर्वसामान्य नागरिकांची जर ससे हेलपट थांबली नाही.

तर येत्या काही दिवसात तालुक्यातील सर्व जेष्ठ नागरिकांना घेऊन तहसील कार्यालयाच्या समोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते रमेश (दादा) आजबे यांनी दिला आहे. यावेळी त्यांच्या समवेत तालुक्यातील बहुसंख्य नागरिक व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *