जिल्हा बँक निवडणुकीसाठी अमोल जगन्नाथ राळेभात पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल..
जामखेड तालुका विविध कार्यकारी सेवा सोसायटी मतदारसंघातून मतदार व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल..
जामखेड प्रतिनिधी
अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.,अहिल्यानगरच्या संचालक मंडळ निवडणूक २०२६-२०३१ करिता मा. जिल्हा बँक संचालक श्री. अमोल जगन्नाथ राळेभात पाटील यांनी जामखेड तालुका विविध कार्यकारी सेवा सोसायटी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला.

यावेळी मतदार व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात तसेच सहकार क्षेत्रातील विविध पदाधिकारी व सभासदांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. अर्ज दाखल करण्यापूर्वी उपस्थित मतदार व कार्यकर्त्यांशी संवाद साधत श्री. अमोल राळेभात पाटील यांनी सहकार क्षेत्रातील विविध प्रश्न, शेतकरी व सभासदांचे हित तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या विकासासाठी सुरू असलेल्या कामांबाबत भूमिका मांडली..
जामखेड तालुका विविध कार्यकारी सेवा सोसायटी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने आगामी जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील सहकार क्षेत्रात राजकीय हालचालींना वेग आला आहे. विविध कार्यकारी सेवा सोसायट्यांशी संबंधित मतदार व कार्यकर्त्यांनी यावेळी उपस्थित राहून श्री. राळेभात पाटील यांना शुभेच्छा दिल्या.
जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकरी, विविध कार्यकारी सेवा सोसायट्या आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेशी संबंधित प्रश्नांना प्राधान्य देण्याचा मुद्दा यावेळी उपस्थित करण्यात आला. त्यामुळे जामखेड तालुका विविध कार्यकारी सेवा सोसायटी मतदारसंघातील ही निवडणूक लक्षवेधी ठरणार असल्याची चर्चा सहकार क्षेत्रात सुरू आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करताना मतदार, कार्यकर्ते, सहकार क्षेत्रातील पदाधिकारी व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उत्साहपूर्ण वातावरणात अर्ज दाखल झाल्यानंतर उपस्थितांनी श्री. अमोल जगन्नाथ राळेभात पाटील यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
![]()



