राशीनमधील अनेक कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश,
आमदार रोहित पवार यांचे राम शिंदेंना हादरे मागून हादरे
कर्जत.०४-
कर्जत जामखेड मतदारसंघात गेल्या आठवड्याभरापासून भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेशाचा ओघ सुरुचं असून आज पुन्हा एकदा राजेंद्र देशमुख यांच्या नेतृत्वाखाली राशीनमधील असंख्य कार्यकर्त्यांनी आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीची तुतारी हाती घेतली. आमदार रोहित पवार यांच्याकडून राम शिंदेंना हादरे मागून हादरे दिले जात असल्याची जोरदार चर्चा सध्या मतदारसंघात रंगली आहे.
कर्जतमध्ये आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत आज राशीनमधील असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश केला. यामध्ये संरपंच भिमराव साळवे, राशीन सहकारी सोसायटीचे संचालक विशाल राऊत, भाजप ओबीसी मोर्चा तालुका उपाध्यक्ष दीपक थोरात, ग्रामपंचायत सदस्य अमोल जाधव, राजेंद्र सौताडे, हर्षद आढाव, शिवकुमार सायकर, अतुल साळवे, दयानंद आढाव, स्वप्निल मोढळे, श्रीकांत साळवे, अमोल जाधव रावसाहेब देशमुख पतसंस्थेचे संचालक संतोष देवगावकर
सदाशिव मासाळ, विश्वास मरळ, सुनिल काका रेणुकर, चेअरमन गोरख काळे, दीपक ढगे, माजी ग्रामपंचायत सदस्य डॉ.अविनाश साळवे यांच्यासह , महेश उकिरडे , योगेश भोज, दादा विटकर, वसिम तांबोळी, सलीम शेख, माऊली लाहोर, दिलीप सायकर, पप्पु भोज, आंबादास जाधव, गोट्या मणियार, मकरंद राऊत, दादा सरोदे, बाबासाहेब राऊत, अर्जुन राऊत, नवनाथ राऊत, तात्यासाहेब सरोदे, राहुल सायकर, संभाजी सायकर, नितीन सायकर, राहुल राऊत, भाऊसाहेब मोहिते, दादा लोंढे, तौसिक सय्यद, प्रशांत दळवी, सागर पंडित, अमोल पंडित, बंडु रेणुकर, सागर जाधव, अक्षय आढाव, जीवण आप्पा काळे, अजय भागवत, सचिन सौताडे , भगवंत काळे, ललित देवगावकर, दत्तात्रय थोरात, इरफान काझी, इस्माईल काझी, प्रदिप सायकर, दिलीपशेठ भैया देवगावकर
अयाज सय्यद, अमोल पोटफोडे, ईश्वर सोनवणे, विशाल गंगावणे, जुबेर कुरेशी, जितु गजरमल, राजु साळवे, राम साळवे, प्रतिक आढाव, हरिकाका कानगुडे, उमेश जंजीरे, जावेद शेख, अण्णा जंजिरे, पप्पु मासाळ, सचिन जाधव, अतुल काळे, भाऊसाहेब देशमाने, अजित मोढळे, परशु सोनवणे, कौशल्य शिरोळे यांचा सामावेश आहे. आमदार रोहित पवार यांनी या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांचं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात स्वागत केलं आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी स्थानिक पदाधिकारी, सहकारी कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. भविष्यात हे सर्व कार्यकर्ते विजयाची तुतारी वाजवल्याशिवाय राहणार नाहीत, असा विश्वास यावेळी आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला.