राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती प्रदेशाध्यक्षा संध्या सोनवणे यांची विधानसभा निवडणुकीसाठी ‘स्टार प्रचारक’ म्हणून नियुक्ती
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आगामी विधानसभा निवडणुकांसाठी युवती प्रदेश अध्यक्षा संध्या सोनवणे यांची ‘स्टार प्रचारक’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
जामखेड प्रतिनिधी,
पक्षाच्या विचारधारेचे सशक्त प्रतिनिधित्व करण्याची मोठी जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिलांच्या सशक्तीकरण आणि सामाजिक न्यायाच्या धोरणांना बळ मिळेल.
संध्या सोनवणे यांनी यापूर्वी विविध युवक आणि महिला विषयक उपक्रमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक महत्त्वाच्या विषयांवर कार्य केले गेले असून, त्यांचे संघटन कौशल्य आणि प्रभावी वक्तृत्व यामुळे त्यांनी पक्षात विशेष ओळख निर्माण केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष मा.सुनील तटकरे आणि यांच्या नेतृत्वात पक्षाच्या प्रत्येक विचारसरणीला अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली आहे.
संध्या सोनवणे यांनी या विश्वासाबद्दल पक्षाचे आभार मानले असून, त्या म्हणाल्या, “माझ्यावर पक्षाने ठेवलेला विश्वास आणि दिलेली जबाबदारी माझ्यासाठी अभिमानास्पद आहे.
पक्षाच्या विचारधारेला मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी पूर्ण समर्पणाने काम करेन आणि येत्या निवडणुकीत आमचा पक्ष नंबर एकचा पक्ष म्हणून पुढे येईल असा विश्वास व्यक्त करते.