डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्सव उत्साहात संपन्न.
जामखेड प्रतिनिधी,
रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश व कन्या विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने नागेश संकुलात डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील जयंती सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कर्मवीर जयंती निमित्त विद्यार्थ्यांनी ढोल पथक ,ताशा पथक, लेझीम पथक, झांज पथक ,मुलींची टिपरी पथक कर्मवीर दिंडी, रिबीन पथक, एनसीसी चे ध्वज पथक, कर्मवीर रथ असे जामखेड शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष बारामती ॲग्रो चे विश्वस्त सौ सुनंदाताई पवार तर प्रमुख उपस्थिती स्कूल कमिटी सदस्य व कर्जत जामखेड विधानसभा अध्यक्ष प्रा मधुकर राळेभात , जेष्ठ सदस्य हरिभाऊ बेलेकर ,रा कॉ महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राजेंद्रजी कोठारी ,विनायक राऊत, सुरेश भोसले ,प्रकाश सदाफुले,न प मुख्याधिकारी अजय साळवे , गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे, आरोळे हॉस्पिटलच्या संचालिका डॉ शोभाताई आरोळे, विद्याताई ओहोळ , उपअभियंता शशिकांत सुतार ,सुभाष फाळके सामाजिक कार्यकर्ते रमेश दादा आजबे , नगरसेवक मोहन पवार, सरपंच बापूसाहेब कार्ले, अमोल गिरमे, प्रहार चे जिल्हा उपाध्यक्ष जयसिंग उगले ,डॉ सचिन काकडे, सुलताना शेख ,प्राचार्य मडके बि के ,मुख्याध्यापिका चौधरी के डी पर्यवेक्षक कोकाटे व्ही के, पर्यवेक्षक संजय हजारे, गुरुकुल प्रमुख संतोष ससाने, प्रा कैलास वायकर, रघुनाथ मोहोळकर ,साळुंखे बी एस विनोद सासवडकर,एनसीसी प्रमुख मयुर भोसले , शिंदे बी एस, नागेश – कन्या विद्यालयातील सर्व विद्यार्थी- विद्यार्थिनी शिक्षक स्टाफ ,पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमा पूजन करून केली.
लेझीम – झांज पथक एनसीसी कॅडेट व ढोल ताशा पथकाने वाजत गाजत मिरवणुकीने यांनी मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
प्रास्ताविक कार्यक्रमाचे प्रास्ताविका मध्ये कर्मवीरांचे विविध पैलू विविध घटना प्राचार्य मडके बि के यांनी सांगितले .
विद्यार्थी भाषण हर्षदीप लटपटे, संचित खैरे विद्या सानप यांनी केले . नागेश – कन्या विद्यालयाला गुणवंत विद्यार्थी बक्षीस देणगी देणारे मान्यवरांचे भव्य असे सत्कार करण्यात आले.
गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे
रयत शिक्षण संस्थेचे शिक्षक प्रामाणिकपणे विद्यार्थी घडवण्याचे काम करतात असे मनोगत व्यक्त केले
स्कूल कमिटी सदस्य सुरेश भोसले यांनी
समाजासाठी कार्य करणाऱ्यांची जयंती पुण्यतिथी वर्षानुवर्षे साजरे होते व त्यांचा आदर्श सर्वांनी घ्यावा शिक्षणाचा वारसा पुढे चालवावा असे मनोगत व्यक्त केले
जामखेड नगर परिषदेचे मुख्य अधिकारी अजय साळवे मनोगत मध्ये
मीही रयत शिक्षण संस्थेचा गुरुकुल चा विद्यार्थी आहे बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाद्वारे खुले करण्यासाठी कर्मवीरांनी कार्य केले आणि त्यांना उन्नतीचा मार्ग दाखवला असे सांगितले
सामाजिक कार्यकर्ते विचारवंत सुभाष वारे
यांनी मनोगतामध्ये
कर्मवीर अण्णांनी बहुजना शिकण्यासाठी वाड्यावर शाळा चालू केल्या.
समाज जातीपातीच्या मध्ये विखुरला गेल्या आहे ज्यावेळेस जातीचा प्रश्न सुटेल त्यावेळेस आपण पूर्ण ताकतीने पुढे जाऊ ,
विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर सामाजिक प्रश्न विचारात घेतले पाहिजे. विज्ञान,इतिहास,लोकशाहीला पूरक अशा सर्व उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.निर्भिड, परखड शब्दांमध्ये चालू घडामोडीवर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ सुनंदाताई पवार यांनी मनोगतामध्ये कर्मवीरांनी दीनदुबळ्या सर्व समाजासाठी शाळा उघडून सर्वसामान्य शिक्षणाचे प्रवाहात आणले, विद्यार्थ्यांनी महापुरुषांच्या थोर समाज सुधारकांचा चरित्र अभ्यास करावे तसेच
विद्यार्थ्यांना नियमित अभ्यास आणि स्वच्छतेची जोपासना करण्याचे आवाहन केले.
गेली 35 वर्षे सामाजिक काम करत असताना मी स्वच्छतेला अधिक महत्त्व देण्याचे काम केले.आपणही हे काम अविरत पणे करावे.असे आवाहन केले.
सूत्रसंचलन संभाजी इंगळे, स्वाती अभंग तर आभार प्रदर्शन, मुख्याध्यापिका सौ चौधरी के डी यांनी केले.